IMPIMP

Pune Corporation | पुण्यातील धनकवडी ‘ट्रक टर्मिनन्स’च्या जागेवर उभारणार ‘ट्वीन टॉवर्स’ ! पालिकेच्या जागा सेवा आणि व्यावसायिक कारणांसाठी वापरण्याचे ‘प्लॅनिंग’

by nagesh
Pune PMC News | corona testing scam worth lakhs in pune pmc pune municipal corporation attempts by senior officials to suppress the scam

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन महापालिकेच्या (Pune Corporation) जागांमधून उत्पन्नाचे नवे स्त्रोत शोधण्यासाठी महापालिका सातत्याने
प्रयत्नशील आहे. यामध्ये प्रामुख्याने हक्काच्या प्राईम लोकेशनवरील ‘लँड बँके’चा (Land Bank of PMC) वापर करून नागरी सुविधांसोबतच उत्पन्न
कसे मिळेल, यासाठी विविध चाचपण्या करत आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून सातारा रस्त्यावरील के.के. मार्केट (K K Market Pune) लगत
असलेल्या ‘ट्रक टर्मिनन्स’च्या (Track Terminus in Pune) जागेवर ‘ट्वीन टॉवर्स’ (Twin Tower in Pune) उभारून नर्सिंग कॉलेज (Nursing
Colleges in Pune), रुग्णालय आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स (Commercial Complex In Pune) उभारण्याबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू
असल्याची माहिती महापालिकेतील (Pune Corporation) सूत्रांनी दिली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सातारा रस्त्यावर (Pune Satara Road) धनकवडी (Dhankawadi Pune) येथील शंकर महाराज मठालगत (Shankar Maharaj Math Pune) सुमारे २५ हजार ७३२ चौ.मिटरची ट्रक टर्मिनन्सची जागा आहे. सातारा रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये बाधित झालेल्या पर्वती दर्शन (Parvati Darshan) येथील व्यावसायीकांचे पुनर्वसनही टर्मिनन्सच्या आवारातच करण्यात आले. नाममात्र भाडेदराने दीर्घकाळासाठी येथे दिलेल्या व्यावसायीक जागांवर ते व्यावसायीक करत असलेला व्यवसायच करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने गॅरेज, फोटो स्टुडीओ व तत्सम व्यवसाय करणार्‍यांचीच संख्या अधिक आहे. परंतू शहराचा विस्तार आणि वाढलेली लोकसंख्या या पार्श्‍वभूमीवर हे टर्मिनन्स आता वर्दळीच्या ठिकाणी आल्याने ट्रक टर्मिनन्स म्हणून या जागेचा वापर दुर्मिळ झाला आहे.

 

 

या जागेचा महापालिकेच्या (Pune Corporation) सेवा देण्यासोबतच व्यावसायिक वापर करण्याबाबत काही पर्याय समोर आले आहेत. यामध्ये पीपीपी किंवा अन्य माध्यमातून ‘ट्वीन टॉवर्स’ उभारण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. के.के. मार्केट या कमर्शियल कॉम्प्लेक्स (K K Market Commercial Complex) लगतच ही जागा असल्याने एका इमारतीमध्ये नर्सिंग कॉलेज आणि हॉस्पीटल सुरू करण्याची संकल्पना आहे. तसेच एक इमारत ‘कमर्शियल’ वापरासाठी विकसित करण्याचे नियाजेन आहे. यामध्ये सध्याच्या व्यावसायीकांच्या पुनर्वसनासोबतच मोठ्या प्रमाणावर ऑफीसेस व व्यवसायीक गाळे निर्माण करणे शक्य होणार आहे.

 

 

रस्ता रुंदी व मोकळी जागा वगळता याठिकाणी फ्री एफएसआय (Free Floor Space Index In Pune), प्रिमियम एफएसआय (Premium FSI), टीडीआर (TDR), ऍन्सीलरी एफएसआयचा (Ancillary FSI) वापर करून १ लाख २९ हजार ९०० चौ.मिटरचे बांधकाम होईल,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यापैकी सध्याच्या व्यावसायिकांसाठी ७ टक्के, विकसकासाठी ८ टक्के, नर्सिंग कॉलेजसाठी १० टक्के, हॉस्पीटलसाठी ३५ टक्के आणि व्यावसायीक इमारतीसाठी ३९ टक्के क्षेत्रफळाचा वापर शक्य असल्याचा प्राथमिक आराखडाच खाजगी संस्थेने सादर केला आहे. या आराखड्यावर नुकतेच प्रशासन व संबधित संस्थेच्या प्रतिनिधींची प्राथमिक बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, चांदीचे भावही वधारले; जाणून घ्या नवीन दर

SSC HSC Exam 2022 | 10 वी-12 वीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

Lata Mangeshkar | लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा; लवकरच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

 

Related Posts