IMPIMP

Shivajirao Adhalrao Patil | अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आढळराव-पाटलांच्या संपत्तीत ५ वर्षात साडेसात कोटींची वाढ, एकूण संपत्ती…

by sachinsitapure

पुणे : Shivajirao Adhalrao Patil | शिरूर लोकसभा मतदार (Shirur Lok Sabha) संघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) उमेदवार आढळराव पाटील हे शिवसेना शिंदे गटातून (Shivsena Eknath Shinde) उमेदवारीसाठी अजित पवारांच्या पक्षात आले. काल त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या उमेदवारी अर्जासोबत त्यांनी जोडलेल्या शपथपत्रातून त्यांची एकुण संपत्ती आणि इतर माहिती समोर आली आहे. मागील पाच वर्षात आढळरावांचे संपत्ती साडेसात कोटींनी वाढली आहे.

खोके, पेटी हे खरं तर वेगळ्या क्षेत्रात वापरले जाणारे शब्द, पण महाराष्ट्रातील राजकारणात खोके हा शब्द मागील काही दिवसात खुपच गाजत आहे. या शब्दातच जाणून घ्यायचे तर आढळरावांची संपत्ती पाच वर्षात साडेसात खोक्यांनी वाढली आहे. २०१९च्या निवडणुकीत त्यांच्याकडे १९ कोटी ७९ लाख रुपयांची संपत्ती होती. आता त्यांची संपत्ती २७ कोटी १४ लाख रुपयांची आहे.

आढळराव पाटलांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, आढळराव यांच्यावर सुमारे दीड कोटी रुपयांचे कर्जही आहे. आढळराव-पाटील यांच्या पत्नीकडे ११ कोटी ४९ लाख रुपयांची संपत्ती आहे तसेच त्यांच्यावर १ कोटी ८० लाख रुपयांची कर्ज आहे.

आढळराव पाटलांची संपत्ती

* रोख रक्कम : ६,४०,६९३
* बँक डिपॉझिट : १,०३,६९,६१६
* शेअर्स गुंतवणूक : ६,६८,४३५
* कार : २०,०००
* स्थावर मालमत्ता : ७ कोटी ४९ लाख
* जंगम मालमत्ता : ११ कोटी १९ लाख
* कर्ज : १ कोटी ५१ लाख

Balbharati Paud Phata Road | बालभारती पौडफाटा रस्त्याची सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटीकडून शुक्रवारी पाहाणी; याचिकाकर्ते, पालिका प्रशासनाची बाजूही ऐकून घेणार

Related Posts