IMPIMP

Pune Crime | जास्त परताव्याचे आमिष दाखवून कॉलेजमधील मित्रानेच घातला 10 लाखांचा गंडा; पुण्यातील प्रकार

by nagesh
Pune Crime News | 10 percent interest on money given for trading! 99 lakhs fraud by loss, case filed in Chandannagar police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | ट्रेड पे कंपनीत (Trade Pay Company) गुंतवणूक केल्यास जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून
कॉलेजमधील मित्राने (College Friend) दहा लाखांची फसवणूक (Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मित्राने
मित्राविरुद्ध फिर्याद दिली असून, पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार (Pune Crime) मे 2021 ते बुधवार (दि.6) या कालावधीत घडला आहे.

 

ओपिंदरसिंग प्रधानसिंग कांत (Opinder Singh Pradhan Singh Kant) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सुभाष वसंत खराडे (वय 65, रा. भोसलेनगर) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) बुधवारी (दि.6) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयपीसी 406, 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे कॉलेजपासून मित्र आहेत. आरोपी याची ट्रेड पे कंपनी असून, त्याने फिर्यादी यांना पैसे गुंतवण्यास सांगितले. तसेच गुंतवलेल्या पैशावर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी यांनी आरोपीवर विश्वास ठेवून 10 लाख 35 हजार 800 रुपयांची गुंतवणूक केली. दरम्यान, फिर्यादी यांनी आरोपीकडे पैशांची मागणी केली असता त्याने दोन चेक दिले.

 

फिर्यादी यांनी आरोपीने दिलेले चेक बँकेत जमा केले. मात्र, ते बाऊन्स झाले.
त्यानंतर आरोपीने वेगवेगळी कारणे देत रक्कम देतो असे सांगितले.
परंतु अद्यापपर्य़ंत पैसे न देता फसवणूक केली. याबाबत फिर्य़ादी यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता.
तक्रार अर्जाची चौकशी करून बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक झरेकर (API Zarekar) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 10 lakh scam by a college friend with the lure of higher returns; Type in Pune

 

हे देखील वाचा :

Pune Crime | एसबीआय बँकेत नोकरीच्या बहाण्याने तरुणाची 5 लाखांची फसवणूक; ताडीवाला रोड परिसरातील घटना

Navneet Rana | संजय राऊतांना आलेल्या धमकीची चौकशी झाली पाहिजे; त्यांची वक्तव्ये म्हणजे…

Devendra Fadnavis | ‘आप’ दिल्लीपुरताच; हे पुन्हा एकदा सिद्ध झाले – देवेंद्र फडणवीस

 

Related Posts