IMPIMP

Pune Crime | एंजल ब्रोकिंग अ‍ॅपच्या सहाय्याने रक्कम दामदुप्पट करण्याच्या आमिषाने 34 लाखांची फसवणूक ! निलम केवट, प्रमोद चव्हाण आणि सचिन चव्हाण यांच्यावर FIR

by nagesh
Pune Crime | 48 lakhs fraud of the company by cross-selling water purifier material; Type at Wagholi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन एंजल ब्रोकिंग अ‍ॅपच्या (Angel Broking App) सहाय्याने शेअर मार्केटमध्ये (Stock Market) पैसे गुंतवल्यास 100 दिवसात रक्कम दामदुप्पट (Amount Double) करण्याचे आमिष दाखवून 34 लाख 82 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात (viman nagar police station) तिघांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून एकाला अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार मार्च 2021 ते 3 डिसेंबर या कालावधीत पुण्यातील (Pune Crime) विमाननगर येथील नीलकमल सक्सेस प्रा. लि. (Nilkamal Success Pvt. Ltd.) या ठिकाणी घडला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

याप्रकरणी निलेश भालचंद्र जगताप Nilesh Bhalchandra Jagtap (वय-42 रा. श्रीरामनगर, खेड शिवापुर, पुणे) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी निलम छोटेलाल केवट Nilam Chhotelal Kewat (वय-30) ला अटक केली आहे. तर प्रमोद अर्जुन चव्हाण (वय-40 रा. पिंपरी) आणि सचिन चव्हाण (वय-40 रा. पिंपरी) यांच्यावर फसवणूकीचा (Cheating) गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करुन एंजल ब्रोकिंग अ‍ॅपच्या (Angel Broking app) सहाय्याने शेअर मार्केटमधील 100 दिवसांच्या दामदुप्पटीचा प्लॅन सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. आरोपींनी फिर्यादी यांना 41 लाख 82 हजार रुपये गुंतवण्यास भाग पाडले. गुंतवलेली रक्कम 100 दिवसांत दामदुप्पट देण्याचे आश्वासन आरोपींनी दिले. तसेच रोजच्या रोज परतावा फिर्यादी यांच्या बँक खात्यात जमा करण्याची हमी दिली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

तसेच शेअर मार्केटमध्ये नुकसान झाले तरी गुंतवलेली रक्कम 100 दिवसांत दामदुप्पट देण्याचे आश्वासन आरोपींनी दिले.
फिर्यादी यांनी गुंतवलेल्या एकूण रक्कमेपैकी 7 लाख रुपये त्यांना परत करण्यात आले.
मात्र, उर्वरीत रक्कम 34 लाख 82 हजार रुपये परत न करता आर्थिक फसवणूक केली.
तक्रारदार यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार (Pune Crime) अर्ज केला होता.
पोलिसांनी चौकशी करुन निलम केवटला अटक केली आहे. पुढील तपास विमानतळ पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 34 lakh fraud with the lure of doubling the amount with the help of Angel Broking app! FIR against Nilam Kewat, Pramod Chavan and Sachin Chavan

 

हे देखील वाचा :

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 37 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Omicron Covid Variant | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले संकेत, म्हणाले…

Income Tax Return 2021 | घरबसल्या ऑनलाइन फाईल करा ITR, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

 

Related Posts