IMPIMP

Pune Crime | कुटुंब कल्याण विभागाचे कंत्राट मिळाल्याचे भासवून व्यावसायिकाची ३९ लाखांची फसवणुक; बनावट वर्क ऑर्डर तयार करुन करायला लावली गुंतवणुक

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Warje Police Station - 86 Lakh fraudster arrested by offering attractive returns

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | सातारा जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad Satara) एकात्मिक आरोग्य व कुंटुब कल्याण संस्थेमध्ये (Institute of Health and Family Welfare) लागणार्‍या वस्तंचा पुरवठा करण्यासाठीच्या ऑर्डरमध्ये गुंतवणुक (Investment) करायला सांगून बनावट वर्क ऑर्डर (Fake Work Order) दाखवून एकाची तब्बल ३९ लाख २० हजार रुपयांची फसवणूक (Fraud Case) करण्यात आली. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी अंकुश मालदेव चव्हाण Ankush Maldev Chavan (वय ४८, रा. टिंगरेनगर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४९३/२२) दिली आहे. त्यानुसार अमोल वसंत क्षीरसागर Amol Vasant Kshirsagar (वय ३८), गणेश यशवंत खिलारे Ganesh Yashwant Khilare (वय ३८), पल्लवी गणेश खिलारे Pallavi Ganesh Khilare (वय २९, रा. काळेपडळ, हडपसर) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार २४ नोव्हेबर २०२१ पासून आजपर्यंत घडला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना सातारा जिल्हा परिषदेच्या एकात्मिक आरोग्य व कुंटुब कलयाण विभागामध्ये लागणार्‍या वस्तुंचा पुरवठा करण्यासाठीच्या ऑर्डरमध्ये पैसे गुंतवणुक करण्यास सांगितले.
त्यांनी गुंतवणुक केल्यानंतर त्याबदल्यात त्यांना सुरुवातीला परतावा म्हणून काही रक्कम देऊन त्यांचा विश्वास
संपादन केला. त्यानंतर फिर्यादी यांच्याकडून त्यांचे फर्मची कागदपत्रे घेतली.
त्यांच्या फर्मच्या नावाने सातारा जिल्हा परिषदेच्या एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्थेच्या वर्क ऑर्डर मिळाल्याचे त्यांना दाखविले.
त्यांच्याकडून ही वर्क ऑर्डर पूर्ण करण्यासठी त्यांचे नावावर नोंद असलेल्या गणेश एन्टरप्रायझेस (Ganesh Enterprises) यांच्याकडून पूर्ण करुन घेतली,
असे दाखवून त्या कामासाठी फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी ३९ लाख २० हजार घेतले.
फिर्यादी यांनी जेव्हा सातारा जिल्हा परिषदेमधून बिल काढण्यासाठी पाठपुरावा केला असता अशी कुठलीही ऑर्डर
सातारा जि. प. मधून फिर्यादी यांना दिली नसल्याचे लक्षात आले.
त्यावरुन आरोपींनी बनावट ऑर्डर पाठवून फसवणुक (Cheating Case) केल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी
फिर्याद दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | 39 lakh fraud by a businessman by pretending to get a contract from the Family Welfare Department; Investment made by creating fake work order

 

हे देखील वाचा :

Uday Samant | ‘मी हात जोडून विनंती करतो…’ उदय सामंतांच्या सूचक ट्वीटची राजकीय वर्तुळात चर्चा, कुणाच्या दिशेनं रोख?

Maharashtra Crime | थायलंडला नोकरीला जाताना सावधान ! ठाण्याच्या तरुणाचे खंडणीसाठी अपहरण, अमेरिकन नागरिकांची फसवणुक करण्याची केली जाते सक्ती

Palghar ACB Trap | एक लाखाची लाच घेताना उपकार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळयात

 

Related Posts