IMPIMP

Uday Samant | ‘मी हात जोडून विनंती करतो…’ उदय सामंतांच्या सूचक ट्वीटची राजकीय वर्तुळात चर्चा, कुणाच्या दिशेनं रोख?

by nagesh
Uday Samant | cabinet minister uday samant tweet appeals some leaders to speak properly

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेनेत बंडखोरी (Rebellion in Shivsena) झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा जोरदार कलगीतुरा सुरु झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे शिवसेनेतील ठाकरे गट (Thackeray Group) विरुद्ध शिंदे गट (Shinde Group) असा सामना सुरु असताना दुसरीकडे शिवसेना विरुद्ध भाजप (BJP) असाही सामना पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर नेत्यांकडून खालच्या पातळीवर टीका होत असल्याचं दिसून आले आहे. यासंदर्भात काही राजकीय नेतेमंडळींनी याआधीही मतं व्यक्त केली असताना उद्योग मंत्री उद्य सामंत (Uday Samant) यांनी आपले मत मांडले आहे. उदय सामंत (Uday Samant) यांनी केलेल्या सूचक ट्वीटची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

उदय सामंत (Uday Samant) यांनी आपल्या ट्विटर हँडलवर आज (बुधवार) सकाळी एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील काही नेत्यांना (Political Leaders) उद्देशून त्यांनी विनंती केली आहे. पण हे ‘काही नेते’ नेमके कोण? यावर मात्र त्यांनी ट्विटमध्ये उल्लेख केलेला नाही.

 

 

काय म्हटले ट्विटमध्ये?

 

महाराष्ट्रातील काही नेत्यांना मी हात जोडून विनंती करतो. राजकारणामध्ये टीका-टिप्पणी होत असते.
पण टीका करताना आपण जी पातळी गाठतोय, ती योग्य आहे असं वाटत नाही. महाराष्ट्र सुसंस्कृत जनतेचा आहे.
भावी पिढीला राजकारण्यांबद्दल तिरस्कार वाटेल, अशी वक्तव्य होऊ नयेत अशी माझी नम्र विनंती,
असं ट्वीट उदय सामंत यांनी केलं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Uday Samant | cabinet minister uday samant tweet appeals some leaders to speak properly

 

हे देखील वाचा :

Maharashtra Crime | थायलंडला नोकरीला जाताना सावधान ! ठाण्याच्या तरुणाचे खंडणीसाठी अपहरण, अमेरिकन नागरिकांची फसवणुक करण्याची केली जाते सक्ती

Palghar ACB Trap | एक लाखाची लाच घेताना उपकार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळयात

Rain in Maharashtra | महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती, आज पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

 

Related Posts