IMPIMP

Pune Crime | फ्लॅट नावावर करण्यासाठी ८३ वर्षाच्या आईला मुलीने मारहाण करुन हात केला फॅक्चर, हडपसर परीसरातील घटना

by nagesh
Pune Crime | Women's jewelry looted on the pretext of sari distribution; Incident at Lal Mahal Chowk

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime | घरदार, स्थावर मालमत्ता, दागदागिने यापुढे नाते संबंध तोडके पडतात. सख्खे पक्के वैरी बनतात. असाच काहीसा प्रकार हडपसरमध्ये (Hadapsar, Pune) समोर आला आहे. मोठ्या मुलीने फ्लॅट आपल्या नावावर करावा, यासाठी आपल्या ८३ वर्षाच्या आईचा हात पिरगळुन तो फॅक्चर केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

याप्रकरणी हडपसरमधील अमरगीत सोसायटीत राहणार्‍या एका ८३ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १३५७/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी परमजित कौर महेंद्रसिंग खनुजा (Paramjit Kaur Mahendra Singh Khanuja) हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ३० ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता घडला होता. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ही फिर्यादी यांची मोठी मुलगी आहे.
‘‘हा फ्लॅट माझ्या नावावर कर, हा फ्लॅट माझ्या वडिलांनी मला दिलेला आहे. तू या घरात परत यायचे नाही.
परत तुम्ही दोघीही येथे आल्यास मी तुमचा जीव घेईन,’’असे परमजित कौर हिने आपल्या आईला धमकाविले.
फिर्यादी व तिची लहान मुलगी यांना शिवीगाळ करुन परमजित कौर हिने आपल्या ८३ वर्षाच्या आईचा उजवा हात
पिरगळला. हाताची करंगळी पिळगल्याने ती फॅक्चर झाली आहे. पोलीस हवालदार क्षीरसागर
(Police Constable Kshirsagar) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :-  Pune Crime | 83-year-old mother was beaten up by her daughter for naming a flat, an incident in Hadapsar area

 

हे देखील वाचा :

Pune Crime | चारित्र्याच्या संशयावरुन पतीने चाकूने भोसकून पत्नीचा केला खून, येरवड्यातील घटना

IND vs BAN | 4 वर्षापासून बांग्लादेशला सतावणाऱ्या ‘त्या’ कमजोरीचा टीम इंडिया उचलणार फायदा

EPFO Interest Rate | अजूनही पीएफ खात्यात व्याज जमा न झाल्याने सदस्यांच्या मनात अनेक शंका, EPFO ने दिली महत्त्वाची माहिती

 

Related Posts