IMPIMP

Pune Crime | चारित्र्याच्या संशयावरुन पतीने चाकूने भोसकून पत्नीचा केला खून, येरवड्यातील घटना

by nagesh
Pune Crime | Husband killed his wife by stabbing her with a knife due to suspicion of her character, incident in Yerwada

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime | चारित्र्याच्या संशयावरुन पतीने चाकूनने पत्नीला भोसकून तिचा खून (Murder in Pune) केल्याचा प्रकार येरवड्यातील जय जवाननगर येथे घडला. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अंकिता अनिल तांबूटकर Ankita Anil Tambootkar (वय ४५, रा. दुर्गामाता मंदिराजवळ, जय जवाननगर, येरवडा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. येरवडा पोलिसांनी (Pune Police) तिचा पती अनिल मनोहर तांबूटकर Anil Manohar Tambootkar (वय ५०) याला अटक (Arrest) केली आहे.

 

अंकिता आणि अनिल तांबूटकर हे जय जवाननगरमध्ये राहत होते. अनिल नेहमीच अंकिताच्या चारित्र्यावर संशय घेत असे. त्यावरुन मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यात भांडणे झाली. रागाच्या भरात त्याने चाकूने तिच्या छातीवर, गळ्यावर वार केले. अंकिता घरात रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन तिला रुग्णालयात नेले. परंतु अति रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यु (Death) झाला. (Pune Crime)

 

या घटनेची माहिती होताच पोलीस उपायुक्त रोहिदास पवार
(Deputy Commissioner of Police Rohidas Pawar), सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव
(Assistant Commissioner of Police Kishore Jadhav), वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम
(Senior Police Inspector Balkrishna Kadam), निरीक्षक उत्तम चक्रे यांनी घटनास्थळाला भेट दिली.
पोलिसांनी पतीला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद खटके
(Assistant Police Inspector Pramod Khatke) तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Pune Crime | Husband killed his wife by stabbing her with a knife due to suspicion of her character, incident in Yerwada

 

हे देखील वाचा :

IND vs BAN | 4 वर्षापासून बांग्लादेशला सतावणाऱ्या ‘त्या’ कमजोरीचा टीम इंडिया उचलणार फायदा

EPFO Interest Rate | अजूनही पीएफ खात्यात व्याज जमा न झाल्याने सदस्यांच्या मनात अनेक शंका, EPFO ने दिली महत्त्वाची माहिती

Pune PMC News | पुण्यात बायोमेट्रीक नोंदणी केलेल्या 22889 पथारी व्यावसायीकांपैकी तब्बल 10674 व्यावसायीक व्यवसायच करत नाहीत

 

Related Posts