IMPIMP

EPFO Interest Rate | अजूनही पीएफ खात्यात व्याज जमा न झाल्याने सदस्यांच्या मनात अनेक शंका, EPFO ने दिली महत्त्वाची माहिती

by nagesh
EPFO Interest Rate | epfo interest credit for 2021 22 delay due to software upgradation

नवी दिल्ली :वृत्तसंस्था  – कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (Employees Provident Fund) खात्यात मागील आर्थिक वर्षाचे व्याज (EPFO Interest Rate) कधी जमा होणार, याच्या सतत तारखा माध्यमांमधून सांगितल्या जात आहेत. दिलेली प्रत्येक तारीख उलटून गेल्यानंतर व्याजाचे पैसे जमा न झाल्याने कर्मचार्‍यांच्या मनात विविध शंका निर्माण होत आहेत. मात्र, आता भविष्य निर्वाह निधी संघटनेने ईपीएफ खातेधारकांच्या पीएफवरील व्याज (EPFO Interest Rate) लवकरच जमा होणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच उशीर का होत आहे याचे कारण देखील सांगितले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ईपीएफओकडून सांगण्यात आले की, सोमवारपासून 2021-22 या वर्षातील व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जमा केलेले व्याज लवकरच लाभार्थ्यांच्या UAN/EPFO खात्यांमध्ये दिसून येईल. मागील आर्थिक वर्षातील व्याज (EPFO Interest Rate) जमा न झाल्याने पीएफ खातेधारकांच्या मनात अनेक शंका निर्माण होत आहेत. एका सदस्याने ईपीएफओला ट्विटरवर याबाबत प्रश्न विचारला असता ईपीएफओने व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे सांगितले. लवकरच व्याज जमा करण्यात येणार असून पूर्ण रक्कम दिली जाईल असे स्पष्ट करण्यात आले.

 

मागील वर्षाचे व्याज सदस्यांच्या खात्यात जमा करण्यास का उशीर होत आहे, याचे कारण सांगताना ईपीएफओने म्हटले आहे की, सॉफ्टवेअर अपग्रेड करण्यात येत असल्याने अद्याप व्याजाची रक्कम जमा झालेली नाही. आर्थिक वर्ष 2021-22 या वर्षासाठी केंद्र सरकारने (Central Government) ईपीएफ खात्यातील जमा रक्कमेवर 8.1 टक्के इतके व्याज देण्याचे जाहीर केले होते. हे व्याज कमी असल्याने अगोदरच सदस्यांमध्ये नाराजी आहे,  त्यातच विलंब झाल्याने कर्मचारी अस्वस्थ आहेत.

 

 

अशी जाणून घ्या पीएफ खात्यातील रक्कम

 

उमंग अ‍ॅप :

उमंग अ‍ॅपच्या (Umang App) माध्यमातून पीएफ खात्यातील रक्कम जाणून घेण्यासाठी ईपीएफ पासबुक
(EPF Passbook) पाहणे, दावे दाखल करणे, दाव्याची स्थिती याबाबतची माहिती मिळते.
उमंग अ‍ॅप डाऊनलोड करून फोन नंबर नमूद करून रजिस्ट्रेशन पूर्ण करता येते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ईपीएफओ वेबसाइट :

ईपीएफओ वेबसाइटवर पीएफ रक्कम जाणून घेण्यासाठी येथील कर्मचार्‍यांसाठी या विभागात मेंबर पासबुक (Member Passbook) या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर तुमचा यूएएन क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉग इन करून पीएफ पासबुक पहा.

 

 

Web Title :-  EPFO Interest Rate | epfo interest credit for 2021 22 delay due to software upgradation

 

हे देखील वाचा :

Chandrapur ACB Trap | 2 लाखाची लाच घेताना सार्वजनिक बंधकाम विभागाचा कनिष्ठ अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune PMC News | पुण्यात बायोमेट्रीक नोंदणी केलेल्या 22889 पथारी व्यावसायीकांपैकी तब्बल 10674 व्यावसायीक व्यवसायच करत नाहीत

आता रोख पैसे जवळ ठेवायची गरज नाही! RBI ने केली Digital Rupee ची सुरुवात

 

Related Posts