IMPIMP

Pune Crime | परवान्यामध्ये खाडाखोड केल्याने चंदननगर परिसरातील गिरणी मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

by nagesh
 Pune Crime News | A case has been filed against the moneylender who demanded 55 thousand even after returning 2.5 lakh on 50 thousand, FIR in Chandannagar police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पिठाची गिरणी चालविण्यासाठी पुणे महापालिकेने Pune Municipal Corporation (PMC) सकाळी ७ ते सायंकाळी ७ असा परवाना दिला होता. या परवान्यात सायंकाळी ७ च्या ऐवजी सायंकाळी ९ असा वेळेत फेरफार करुन महापालिकेची फसवणुक (Cheating Case) केल्याचा गुन्हा (Fraud Case) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी महापालिकेचे परवाना निरीक्षक व्यंकटेश पवार यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. २९४/२२) दिली आहे. त्यानुसार शंकर मुक्ताजी शिंदे Shankar Muktaji Shinde (वय ७२, रा. प्रसाद सोसायटी, वडगाव शेरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर शिंदे यांचे वडगाव शेरी येथे श्री गणेश फ्लोअर मिल ही पिठाची गिरणी आहे. त्यांना गिरणीचा परवाना देण्यात आला होता. परवान्यामध्ये गिरणी चालविण्याची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजता असे नमूद होते. त्यांनी या परवान्यात गिरणीची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत असा बदल केला होता.

याबाबत प्रमोद दामोदरे यांनी महापालिकेकडे तक्रार केली होती.
या तक्रार अर्जाची चौकशी करण्यासाठी फिर्यादी गिरणीमध्ये गेले असताना त्यांनी परवान्याची पाहणी केली.
त्यांच्या पवान्याची मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत आहे.
महापालिकेच्या परवान्यामध्ये सायंकाळी ७ वाजेपर्यंत जागी खाडाखोड करुन सायंकाळी ९ वाजेपर्यंत करण्यात आल्याचे आढळून आले.
मुळ परवान्याची तपासणी केली असता त्यात खाडाखोड केल्याचे आढळून आले.
त्यामुळे परवान्यातील वेळेत फेरफार करुन महापालिकेची फसवणूक (Cheating With PMC) केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक पालवे तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | A case has been registered against a mill owner in Chandannagar area for tampering with the license

 

हे देखील वाचा :

Lords च्या मैदानात मुकेश अंबानी, सुंदर पिचाई आणि रवि शास्त्री दिसले सोबत, ‘हा’ प्लान तर नाही ना ?

NCP Chief Sharad Pawar | भाजपकडून प्रादेशिक पक्षांना कसं संपवलं जातं, शरद पवारांनी मांडली ‘परफेक्ट’ थिअरी

Pune Crime | गुंतवणुकीवर 20 टक्के मोबदला देण्याच्या आमिषाने महिला पोलिसाकडून 20 लाखांची फसवणूक

 

Related Posts