IMPIMP

Lords च्या मैदानात मुकेश अंबानी, सुंदर पिचाई आणि रवि शास्त्री दिसले सोबत, ‘हा’ प्लान तर नाही ना ?

by nagesh
Lords | mukesh ambani and sundar pichai spotted at lords spark rumours of big investment

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Lords | आशियातील (Asia) दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांच्यासोबत दिसले. दोघे एकत्र आल्यानंतर मोठ्या गुंतवणुकीच्या (Invest) चर्चेला वेग आला आहे. या दोन्ही दिग्गजांचा एक फोटो सोशल मीडिया (Social Media) वर व्हायरल होत आहे, जो भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी शेअर केला आहे. (Lords)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Lords च्या मैदानावर झाली भेट

रवी शास्त्रींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलेल्या छायाचित्रात सिलिकॉन व्हॅलीचे सर्वात प्रभावशाली सीईओ सुंदर पिचाई एका बाजूला रवी शास्त्री आणि दुसर्‍या बाजूला मुकेश अंबानी दिसत आहेत. हा छायाचित्रं होम ऑफ क्रिकेट लॉर्ड्सच्या मैदानावर घेतलेले आहे. छायाचित्राच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटचा सामना सुरू आहे.

 

अंबानींना क्रिकेटमध्ये विशेष रस

रिलायन्सच्या प्रमुखांना क्रिकेटमध्ये किती रस आहे हे सर्वांनाच माहित आहे. आयपीएलमधील त्याची स्वत:ची टीम मुंबई इंडियन्स आहे. अशावेळी ’द हंड्रेड अ‍ॅट होम ऑफ क्रिकेट’ च्या दुसर्‍या सीझनच्या दरम्यान रवी शास्त्री यांच्यासोबत झालेल्या दोन भारतीय व्यक्तींच्या भेटीनंतर इंग्लंडच्या क्रिकेट लीगमध्ये संभाव्य गुंतवणुकीची शक्यता वर्तवली जात आहे.

मात्र, या अनुमानावर बिझनेस टुडेने आरआयएलशी संपर्क साधला तेव्हा कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, यावेळी टिप्पणी करणे कठीण आहे. भारतानंतर मुकेश अंबानींच्या रिलायन्स ग्रुपने दक्षिण आफ्रिका आणि यूएईमधील टी – 20 लीग संघही विकत घेतले आहेत. अंबानींच्या टी – 20 संघातील सर्वात नवीन नाव केपटाऊन आहे.

 

पिचाई यांचे स्वप्न होते क्रिकेटर बनण्याचे

दुसरीकडे, गुगलचे भारतीय वंशाचे सीईओ सुंदर पिचाई हे देखील क्रिकेटचे मोठे चाहते मानले जातात.
प्रोफेशनल क्रिकेटर बनणे हे त्यांचे स्वप्न होते असे त्यांनी म्हटले होते.
2015 मध्ये भारत दौर्‍यावर असताना पिचाई यांनी दिल्लीत म्हटले होते की, मी भारतीयांप्रमाणे क्रिकेटर बनण्याचे स्वप्न पाहिले होते.
ते स्वत: सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकरचे चाहते असल्याचे सांगितले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

क्रीडा क्षेत्रात गुंतवणूकीचा अंदाज

हे छायाचित्र पोस्ट करत रवी शास्त्री यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, दोन लोकांचा शानदार सहवास जे क्रिकेटवर प्रेम करतात…
मुकेश अंबानी आणि सुंदर पिचाई.
जर आपण गुंतवणुकीचा अंदाज पाहिला तर अंबानी आणि पिचाई यांचे क्रिकेटबाहेरही व्यावसायिक संबंध आहेत.

2020 मध्ये, Google ने Reliance Jio मध्ये 7.7 टक्के भागीदारीसाठी 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.
अशावेळी दोघेही आता क्रीडाक्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहेत की काय, अशा शक्यतांना जोर आला.

 

Web Title : –  Lords | mukesh ambani and sundar pichai spotted at lords spark rumours of big investment

 

हे देखील वाचा :

NCP Chief Sharad Pawar | भाजपकडून प्रादेशिक पक्षांना कसं संपवलं जातं, शरद पवारांनी मांडली ‘परफेक्ट’ थिअरी

Pune Crime | गुंतवणुकीवर 20 टक्के मोबदला देण्याच्या आमिषाने महिला पोलिसाकडून 20 लाखांची फसवणूक

Best Multibagger Penny Stocks 2022 | 7-8 महिन्यापूर्वी होते कवडीमोलाचे, 500% पर्यंत वाढले आहेत हे 5 स्टॉक्स

 

Related Posts