IMPIMP

Pune Crime | मुंढव्यात टोळक्याचा राडा, एकावर कोयत्याने वार करुन केली गाड्यांची तोडफड

by nagesh
Chhatrapati Sambhajinagar Crime News | lodge owner and his son were brutally beaten up by mob for not allowing them to go to the toilet vaizapur

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | कोयत्याचा धाक दाखवून व्यावसायिकाकडे पैशांची मागणी करुन दुकानाची तोडफोड केली. तसेच वाहनांची तोडफोड करुन हवेत कोयते फिरवून टोळक्याने परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करुन तिघांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार (Pune Crime) सोमवारी (दि.21) रात्री 9.45 ते 11.45 च्या सुमारास मुंढवा येथील केशवनगर मध्ये घडला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आदित्य कांबळे, आकाश अनिल जाधव, अनिकेत सुनिल पुरी, सोहेल शब्बीर शेख (सर्व रा. केशवनगर) आणि एका अनोळखी आरोपी विरुद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात आयपीसी 307, 452, 384, 506(2), 427, 34, मुंबई पोलीस अ‍ॅक्ट, आर्म अ‍ॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट एक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ओमाराम दुर्गाराम चौधरी (वय-43 रा. शिंदेवस्ती, केशवनगर, मुंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आदित्य कांबळे व त्याचा मित्र हे फिर्यादी यांच्या हरीओम ट्रेडींग कंपनी या दुकानात आले. आरोपींनी फिर्यादी यांना कोयत्याचा धाक दाखवुन पैशांची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच दुकानातील सामानाची तोडफोड केली. यानंतर आरोपींनी PMPML, स्वीफ्ट आणि एका मिनी बसच्या काचांवर कोयत्याने मारुन तोडफोड केली.

 

टोळक्याने गाड्यांची तोडफोड केल्यानंतर हवेत कोयते फिरवून परिसरात दहशत माजवली.
तसेच जुन्या भांडणाच्या रागातून आरोपी आकाश जाधव, अनिकेत पुरी, सोहेल शेख व इतर दोघांनी
कौशिक कुमार रेड्डी याच्यावर वार केले. यामध्ये रेड्डी हा गंभीर जखमी झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आकाश जाधव, सोहेल शेख आणि
अनिकेत पुरी यांना अटक केली. तर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | A mob ransacked in Mundhwa, vandalized cars by stabbing one of them with a coyote

 

हे देखील वाचा :

Bigg Boss 16 | सुम्बुल तौकीर खानच्या वडिलांनी तिला दिलेल्या सल्ल्याची सर्वत्र चर्चा; जाणून घ्या नक्की काय म्हणाले…

PM Narendra Modi | अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकांकडून पीएम नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट, ‘त्या’ ऑडिओ मेसेजनं प्रचंड खळबळ

Pune Pimpri Crime | महिला पोलिसाला मारहाण करुन विनयभंग, आळंदी मधील घटना

 

Related Posts