IMPIMP

Pune Crime | काय सांगता ! होय, चक्क पुणे महापालिकेला 1 कोटी रुपयांचा गंडा घालण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

by nagesh
Pune PMC News | Pune Municipal Administration has made the process of TDR even easier from today; Stage no. 2 to the Commissioner and the powers of the Standing Committee to the Additional Commissioner

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | अधिकार्‍यांच्या बनावट सह्या करुन कामे झाल्याची दाखवून पुणे महापालिकेची (PMC) 99 लाख 8 हजार रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

पुणे महापालिकेच्या (Pune Corporation) सर्वसाधारण सभेत (PMC GB) गुरुवारी या विषयावर विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला व प्रशासनाला धारेवर धरले होते.
त्यानंतर महापालिकेच्या वतीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली.

याप्रकरणी महापालिकेचे अधिकारी प्रल्हाद पवार यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरुन योगेश चंद्रशेखर मोरे Yogesh Chandrashekhar More (रा. गणेश पार्क, सिंहगड रोड) याच्याविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १० फेब्रुवारी ते २१ ऑक्टोबर २०२१ दरम्यान घडला आहे.

पुणे महापालिकेच्या बाणेर (Baner), कोथरुड (Kothrud) तसेच नवी पेठेमधील (Navi Peth) वैकुंठ स्मशानभूमी

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

येथे विद्युत विषयक कामे केल्याचे एकूण 99 लाख 8 हजार रुपयांची खोटी बनावट बिले तयार करुन ती खरी आहेत, असे भासविले.
मनपाचे सर्वसाधारण फॉर्म बिल फार्म तयार करुन संबंधित पूर्व परवानगी व शिफारसी देणार्‍या अधिकार्‍यांच्या बनावट सह्या व शिक्के मारुन परस्पर कार्यालयीन जावक करुन आरोग्य विभागाकडे मंजुरीसाठी ही खोटी बिले पाठविली.
ही बिले मंजूर करुन महापालिकेची आर्थिक फसवणूक (Cheating with PMC) करण्याचा प्रयत्न केला आहे,
म्हणून हा गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

कोरोना काळात विना निविदा एक कोटी रुपयांची काम झाल्याचे दाखवून त्याचे बिल मंजूर करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता.
याप्रकरणी मुख्य सभेत गुरुवारी आंदोलनही करण्यात आले़.
विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला व प्रशासनाला जाब विचारला होता.
त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी दक्षता विभागाची समिती स्थापन करण्यात येईल.
फौजदारी कारवाई व प्रशासकीय चौकशी करण्यात येईल,
असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार (pmc additional commissioner dr kunal khemnar) यांनी दिले होते.
त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक शेळके तपास करीत आहेत.

 

Web Title: Pune Crime | cheating with pune corporation fake bills fir against yogesh chandrashekhar more in shivaji nagar police station pune crime

 

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau Mumbai | महिला उपजिल्हाधिकार्‍यासह तिघे 1.20 लाखाची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात, प्रथमच वेगळ्या प्रकारे रचला ‘सापळा’; प्रचंड खळबळ

HM Amit Shah | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुणे दौरा तात्पुरता स्थगित

Real Estate Prices | ‘या’ कारणामुळं फ्लॅट-घरांच्या किंमतीत होवू शकते तब्बल 15 टक्क्यापर्यंतची वाढ, जाणून घ्या

 

Related Posts