IMPIMP

Anti Corruption Bureau Mumbai | महिला उपजिल्हाधिकार्‍यासह तिघे 1.20 लाखाची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात, प्रथमच वेगळ्या प्रकारे रचला ‘सापळा’; प्रचंड खळबळ

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Pune | Inspector of Police, Assistant Sub-Inspector and private persons involved in a bribery case of Rs 2 lakh in Pune; Both arrested while PI absconding, huge uproar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Anti Corruption Bureau Mumbai | झोपडी पाडल्यानंतर संबंधितास पूनर्वसनासाठी सदनिका वितरण पत्र (Allotment Letter) देण्यासाठी तब्बल 1 लाख 20 हजार रूपयांच्या लाच प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Mumbai) सापळा रचून खासगी व्यक्तीसह महिला उपजिल्हाधिकारी, सहाय्यक समाज विकास अधिकारी आणि एका खासगी व्यक्तीविरूध्द कारवाई केली आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

उपजिल्हाधिकारी संगिता अतुल टकले Deputy Collector Sangita Atul Takle (वय 50, एमएमआरडीए, बी के सी कलानगर, बांद्रा), सहायक समाज विकास अधिकारी शहाजी पांडुरंग जोशी Shahaji Pandurang Joshi (वय ४२) आणि खासगी व्यक्ती जगदीश शिवराम पाटील Jagdish Shivram Patil (वय ३६, रा. अस्मी कॉम्प्लेक्स, गोरेगाव पश्चिम) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत. या घटनेत एकच खळबळ उडाली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

तक्रारदार यांची विलेपार्ले (vileparle) येथील राजाराम वाडी (Rajaram Wadi) येथे झोपडी होती. सहार उन्नत मार्ग या प्रकल्पातील विस्तारीत करण्यासाठी एमएमआरडीए (MMRDA) विभागाकडून तक्रारदार यांची झोपडी तोडण्यात आली होती. त्याऐवजी एमएमआरडीए विभागाकडून तक्रारदार यांना कुर्ला पश्चिम येथील एचडीआयएल येथील इमारतीत सदनिका वितरण पत्र देण्यात येणार होते. तक्रारदार यांनी वितरण पत्र मिळण्यासाठी सामाजिक विकास कक्ष येथे विनंती अर्ज केला होता. हा अर्ज समाज विकास अधिकारी शहाजी जोशी (Shahaji Pandurang Joshi) आणि उपजिल्हाधिकारी संगिता टकले (Sangita Atul Takle) यांच्याकडे प्रलंबित होता. सदनिका वितरण पत्र देण्यासाठी जोशी याने तक्रारदाराकडे दीड लाख रुपयांची लाच मागितली.

त्यानंतर तक्रारदार यांनी १६ नोव्हेबरला या दोघांविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau Mumbai) तक्रार केली. त्यानंतर १७ नोव्हेबर रोजी या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. तेव्हा शहाजी जोशी याने स्वत: व उपजिल्हाधिकारी संगिता टकले यांच्याकरीता दीड लाखांची मागणी करुन त्यात तडजोड करुन १ लाख २० हजार रुपये स्वीकारण्यास कबुल केले.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

त्यानुतर १८ नोव्हेबर रोजी सापळा रचण्यात आला.
जोशी याने तक्रारदार यांना त्यांच्या ओळखीची खासगी व्यक्ती जगदीश पाटील यांच्याकडे लाचेची रक्कम देण्यास सांगितले.
पाटील याला लाचेची रक्कम स्वीकारताना सापळा रचून पकडण्यात आले.
त्यानंतर जगदीश पाटील याच्याकडून ही रक्कम स्वीकारताना शहाजी जोशी याला पकडण्यात आले.
त्यानंतर ही रक्कम स्वीकारल्याबाबत जोशी याने उपजिल्हाधिकारी संगिता टकले यांना कळविले.
त्याला त्यांनी संमती दर्शविली.
हा सर्व पुरावा जमा करुन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तिघांना (Anti Corruption Bureau Mumbai) पकडले.
तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याविरूध्द कारवाई सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.

 

Web Title :- Anti Corruption Bureau Mumbai | Three, including a woman deputy collector Sangita Atul Takle, took a bribe of Rs 1.20 lakh. Huge excitement Anti Corruption Bureau Mumbai ACB Mumbai

 

हे देखील वाचा :

HM Amit Shah | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुणे दौरा तात्पुरता स्थगित

Real Estate Prices | ‘या’ कारणामुळं फ्लॅट-घरांच्या किंमतीत होवू शकते तब्बल 15 टक्क्यापर्यंतची वाढ, जाणून घ्या

Ricky Ponting | टीम इंडियाच्या हेड कोचची मिळाली होती ‘ऑफर’, रिकी पाँटिंगचा मोठा खुलासा

 

Related Posts