IMPIMP

Pune Crime | गुन्ह्यात अडकवण्याची भीती घालून 5 लाखाची खंडणी उकळणाऱ्या तोतया पोलिसाला गुन्हे शाखेकडून अटक

by nagesh
Pune Crime | Fake policeman who extorted Rs 5 lakh extortion fearing involvement in crime arrested by crime branch

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime | वेगवगेळ्या गुन्ह्यात, कोर्ट केसमध्ये अडकवण्याची आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्याची भीती घालून पाच लाखाची खंडणी उकळणाऱ्या तोतया पोलिसाला गुन्हे शाखेने अटक केली आहे. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-2च्या पथकाने ही कारवाई (Pune Crime) केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मधुकर विलास सापळे (रा. ए विंग, समृद्धी लेक शोर, जांभुळवाडी रोड, आंबेगाव, पुणे, मुळ रा. बेळगांव, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या तोतया पोलिसाचे नाव आहे. याबाबत चंदननगर पोलीस ठाण्यात आयपीसी 384, 385, 389, 419 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विमाननगर येथे राहणाऱ्या व्यक्तीने फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

आरोपी मधुकर सापळे याने फिर्यादी यांना आपण पोलीस असल्याची बतावणी केली. त्याने फिर्यादी यांना गुन्ह्यात, कोर्ट केसमध्ये अडकवण्याची भीती घातली. तसेच अकोला येथे पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्याचे खोटे सांगून पोलीस अटक करुन त्रास देतील अशी भीती घातली. तसेच फिर्यादी राहत असलेल्या सोसायटीची निवडणुक रद्द करण्यासाठी उपनिबंधक सहकारी संस्था पुणे यांच्या सहीचे बनावट पत्र तयार करुन पैशांची मागणी केली.

आरोपीने फिर्यादी यांच्याकडून 14 एप्रिल ते 15 जून या कालावधीत विमाननगर, वडगावशेरी येथे फोन पे
वरती वेळोवेळी अडीच लाख रुपये जमा करुन घेतले.
तसेच आरोपीने एक लाख व दीड लाख रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा फोल्ड मोबाईल घेतला.
आरोपीने फिर्यादी यांच्याकडून रोख आणि मोबाईल अशी एकूण 5 लाख 5 हजार रुपये खंडणी घेतली.
याबाबत फिर्यादी यांनी सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-2 कार्यालयात तक्रार अर्ज केला होता.
तक्रार अर्जाचा तपास करुन पोलिसांनी आरोपीला अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-2 पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शंकर पाटील करीत आहेत. आरोपीविरुद्ध बेळगाव शहर सिईएन सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णीक,
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे,
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-2 नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शंकर पाटील,
पोलीस अंमलदार सुधीर इंगळे, राहुल सकट, अमोल वाडकर यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime | Fake policeman who extorted Rs 5 lakh extortion fearing involvement in crime arrested by crime branch

हे देखील वाचा :

Vikram Gokhale Health Update | विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा

Ved Teaser | रितेश आणि जेनेलियाच्या नव्या चित्रपटाचा टीझर रिलीज; अभिनेता अक्षय कुमारच्या ट्विटने वेधले सगळ्यांचे लक्ष

Pune Crime | भांडणे मिटविण्यासाठी गेलेल्या युवकासह मित्रावर कोयत्याने वार करुन खूनाचा प्रयत्न

Related Posts