IMPIMP

Pune Crime | पिंपरी व पुणे महापालिकेची फसवणुक ! महेश धूत, निंबाळकर, कर्‍हे, मिसाळ, कोळपे, अल्हाट, सोनवणे, साळवे, कदम, पाटील, सिध्दनाथ डेव्हलपर्स तर्फे जहाँगिर हूसेन मुल्ला, साई स्वराज डेव्हलपर्सचे पोपट पायगुडे, हेमचंद्र भाटी, समीर कडु, मे. सातव पाटील एंटरप्रायसेसचे निखील सातव यांच्याविरूध्द हडपसर पोलिस ठाण्यात FIR

बनावट गुंठेवारी, बनावट NA Order जोडणार्‍या 19 जणांवर 7 गुन्हे दाखल

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Lonikand Police Station - Fraud of a senior citizen by using fake purchase documents on the pretext of renting a place

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | हडपसर येथील मेगा सेंटरमधील (Mega Center Hadapsar, Pune) सहायक दुय्यम निबंधक
कार्यालयात दस्त नोंदणी करताना एजंटांमार्फत बनावट कागदपत्रे (Fake Documents) सादर करुन दस्त नोंदणी करणारे आता अडचणीत आले
आहेत. बनावट गुंठेवारी, बनावट एन ए ऑर्डर (Fake NA Order) जोडणार्‍या १९ जणांवर ७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे एजंटाद्वारे काम
करुन घेणार्‍यांनी शासनाबरोबर पिंपरी Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) व पुणे महापालिकेच्या Pune Municipal
Corporation (PMC) बांधकाम विभागाची फसवणुक (Cheating Case) केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत विष्णु तुकाराम आम्ले (रा. फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. १११६/२२) दिली आहे. त्यानुसार नंदा नामदेव निंबाळकर, अमोल नामदेव निंबाळकर, अजित नामदेव निंबाळकर, सोनाली अतुल निंबाळकर व महेश ओमप्रकाश धुत (रा. लेकटाऊन सोसायटी, कात्रज – Katraj) व त्यांना बेकायदेशीर कामासाठी मदत करणारे इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हडपसर येथील मेगा सेंटरमध्ये असलेल्या सहायक दुय्यम निबंधक वर्ग २ च्या कार्यालयात लिपिक म्हणून काम करतात.
या कार्यालयात नोंदविण्यात आलेल्या दस्तास जोडण्यात आलेल्या कागदपत्रांच्या सत्यता,
वैधता कायदेशीर बाबींसाठी तसेच खोटे आढळल्यास नोंदणी अधिनियमाचे कलम ८२ अन्वये संपूर्ण जबाबदार असल्याचे प्रतिज्ञापत्र दिलेले आहे.
दस्त लिहून देणार व त्यांना बेकायदेशीर कामासाठी मदत करणारे इतर यांनी स्वत:चे फायद्याकरीता दस्तास बनावट नियमितीकरण दाखल जोडून तो नोंदणी करुन सहायक दुय्यम निबंधक व पुणे महापालिकेचे उप अभियंता बांधकाम विकास विभाग यांची फसवणूक केली.

 

अशाच प्रकारे बनावट एन ए (अकृषिक परवानगी) जोडून फसवणूक केल्याप्रकरणी सावळाराम भिमाजी कर्‍हे,
सिताराम कर्‍हे, मंगल कर्‍हे, मंगळ कोळपे, अंजना बापू कोळपे, बायडाबाई जालींधर मिसाळ,
लता राजाराम कोळपे यांच्यातर्फे करणारे इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार २९ डिसेबर २०२१ ते ७ जानेवारी २०२२ दरम्यान घडला होता.

 

बनावट गुंठेवारी नियमितीकरणाच्या प्रकरणाचा दाखल जोडून दुय्यम निबंधक व पिंपरी चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंता यांची फसवणूक केल्याबद्दल अरुण कृष्णा अल्हाट, पुष्पवती सोनवणे, विजया मुकुंदा साळवे,
कल्पना खंडुजी कदम यांच्या तर्फे कुलमुख्यातर म्हणून सुशांत अनिल पाटील व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बनावट एन ए (अकृषीक परवानगी) ऑर्डर जोडून फसवणूक केल्याप्रकरणी सिद्धनाथ डेव्हलपर्सतर्फे
जहाँगीर हुसेन हमजुद्दीन मुल्ला (रा. आंबेगाव बु़) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

आणखी एन ए प्रकरणात श्री साई स्वराज डेव्हलपर्सतर्फे भागीदार पोपट बबन पायगुडे (रा. कात्रज),
हेमचंद सोमनाथ भाटी (रा. कात्रज) यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे.

 

दस्ताला बनावट एऩ ए़ (अकृषीक परवानगी) जोडून उपविभागीय दंडाधिकारी हवेली यांची फसवणूक केल्याप्रकरणी
समीर गोविंद कडु (रा. सुखसागरनगर, कात्रज) व त्यांना मदत करणार्‍यांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

तसेच सातव पाटील एंटरप्रायसेस तर्फ प्रो. प्रा. निखील किसन सातव (रा. वाघोली) व त्यांना मदत करणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट कागदपत्रे सादर करुन फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या.
त्यानंतर समितीमार्फत कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली.
या समितीने दिलेल्या अहवालानुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले असून हडपसर पोलीस तपास करीत आहेत.

 

Vishnu Tukaram Amle, Nanda Namdev Nimbalkar, Amol Namdev Nimbalkar, Ajit Namdev Nimbalkar, Sonali Atul Nimbalkar, Mahesh Omprakash Dhoot, Savalaram Bhimaji Karhe, Sitaram Karhe, Mangal Karhe, Mangal Kolpe, Anjana Bapu Kolpe, Baidabai Jalindhar Misal, Lata Rajaram Kolpe, Arun Krishna Alhat, Pushpavati Sonwane, Vijaya Mukunda Salve, Kalpana Khanduji Kadam, Sushant Anil Patil, Jahangir Hussain Hamjuddin Mulla, Popat Baban Paigude, Hemchand Somnath Bhati, Sameer Govind Kadu, Nikhil Kisan Satav,

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : –  Pune Crime | Fraud of Pimpri and Pune Municipal Corporation! Mahesh Dhoot Nimbalkar Karhe Misal Kolpe Alhat Sonwane Salve Kadam Patil Jahangir Hussain Mulla by Siddhanath Developers Popat Paigude of Sai Swaraj Developers Hemchandra Bhati Sameer Kadu M/s. FIR against Nikhil Satav of Satav Patil Enterprises in Hadapsar Police Station

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar On Shivsena Dussehra Melawa | दसरा मेळावा वादात अजित पवारांची उडी; दोन्ही गटाला सुनावलं

Pune Crime | बनावट पावती पुस्तके तयार करुन सोसायटीच्या नावाने गोळा केली वर्गणी; तरुणाविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात FIR

Pune Crime | 1 कोटींची फसवणूक करणार्‍या पुण्यातील सुप्रसिध्द वकिलावर गुन्हा दाखल

 

Related Posts