IMPIMP

Ajit Pawar On Shivsena Dussehra Melawa | दसरा मेळावा वादात अजित पवारांची उडी; दोन्ही गटाला सुनावलं

by nagesh
Ajit Pawar On Shivsena Dussehra Melawa | ajit pawar reaction on eknath shinde uddhav thackeray shivsena dussehra melawa controversy

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Ajit Pawar On Shivsena Dussehra Melawa | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shivsena chief Balasaheb Thackeray) यांनी सुरू केलेला दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. मात्र, पक्षात बंडखोरी केलेले एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आता दसरा मेळाव्यावर सुद्धा दावा केल्याने शिवसेना विरूद्ध शिंदे यांच्यात नवीन वाद निर्माण झाला आहे. शिंदे गटाने शिवसेनेवर हक्क सांगितला असल्याने आता दसरा मेळावा कोण घेणार हा प्रश्न आहे. या वादात आता राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उडी घेतली असून आपले मत व्यक्त केले आहे. (Ajit Pawar On Shivsena Dussehra Melawa)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अजित पवार म्हणाले, शिवसेनेच्या स्थापनेपासून आजतागायत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सभा शिवाजी पार्कवर (Shivaji Park) होत होती. बाळासाहेब ठाकरे यांनीच मैदानात सांगितले होते इथून पुढे शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात पुढे वाटचाल करेल. परंतु 20 जूनपासून अनेक घडामोडी घडल्या त्या सगळ्यांनी पाहिल्या आहेत. आता मैदान वापराची परवानगी मागितली जाते. ज्यांच्या हातात सत्ता ते त्यांना पाहिजे असेल तसे करतात. त्यामुळे वाद घालून चालणार नाही. सर्वसामान्य जनता कुणाच्या पाठिशी आहे हे शिवाजी पार्कवरील सभा झाल्यावर कळेल. त्याचसोबत निवडणुका झाल्यावर कुणाची शिवसेना खरी हेदेखील कळेल. (Ajit Pawar On Shivsena Dussehra Melawa)

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना अजित पवार पुढे म्हणाले की, माध्यमांकडे सध्या बातम्या नाहीत. अशोक चव्हाण (Ashok Chavan), देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) भेटीबाबत नकार दिला आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने काम करत असतो. जनता निवडून देत असते. गणेशोत्सव वर्षानुवर्षे सुरू आहे. यंदा गाठीभेटी वाढल्या आहेत. परंतु आम्हीही गणपतीच्या दर्शनासाठी जातो पण कॅमेरा घेऊन जात नाही. जो गणेशभक्त आहे त्याने अशाप्रकारे देखावा करत नाही. पूर्वीच्या काळात शोमॅन होते, राज कपूर शोमॅन म्हणून ओळखले जायचे तसे हल्ली काहींना शो करायची सवय आहे. जनतेनेच बघावे काय चालले आहे आणि काय नाही.

 

दरम्यान, शिवसेनेतील आणखी एक बंडखोर नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनीही दसरा मेळाव्यावर बोलताना ठाकरे कुटुंबियांनाच टार्गेट केले आहे.
कदम यांनी म्हटले की, बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिली.
बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना नाही.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पुरस्कृत उद्धव सेना आहे.
त्यांना बाळासाहेबांचे विचार सांगण्याचा अधिकार नाही. खरी शिवसेना कुणाची याबाबत न्यायदेवता निर्णय देईल.
उद्धव ठाकरे ज्यावेळी म्हटले बाळासाहेब साधे होते, मी हुशार आहे. त्यादिवशी महाराष्ट्राच्या जनतेला कळाले.
शिवसेनाप्रमुखांच्या पुण्याईवर ते गादीवर बसले. आम्हीच बाळासाहेबांची शिवसेना आहोत.
त्यामुळे दसरा मेळावा एकनाथ शिंदे यांनी घ्यावा अशी विनंती मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना करणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Ajit Pawar On Shivsena Dussehra Melawa | ajit pawar reaction on eknath shinde uddhav thackeray shivsena dussehra melawa controversy

 

हे देखील वाचा :

Pune Crime | बनावट पावती पुस्तके तयार करुन सोसायटीच्या नावाने गोळा केली वर्गणी; तरुणाविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात FIR

Pune Crime | 1 कोटींची फसवणूक करणार्‍या पुण्यातील सुप्रसिध्द वकिलावर गुन्हा दाखल

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बप्पाचे दर्शन

 

Related Posts