IMPIMP

Pune Crime | चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांकडून अटक, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

by nagesh
Pune Crime News | Innkeeper who stole from PMPML bus arrested, valuables seized

लोणी काळभोर : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुणे ग्रामीण भागात रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे दुचीकीवरुन येऊन सोन्याचे दागिने (Stealing Gold Jewelry) चोरणाऱ्या (Thieves) दोघांना पुण्यातील ( Pune Crime) लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police) अटक केली आहे. त्यांच्याकडून दुचाकी आणि चोरलेले सोन्याचे दागिने असा एकूण दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई कदमवाकवस्ती गावच्या हद्दीत करण्यात आली असून दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शाहरुख सलीम शेख (वय-22 रा. कदमवाकवस्ती ता. हवेली, जि. पुणे मुळ रा. मुरुड ता.जि. लातूर), हरीश किसन कोळपे (वय-21 रा. वाडेबोल्हाई ता. हवेली, जि. पुणे) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या (Loni Kalbhor Police Station) हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार शैलेश कुदळे (Shailesh Kudale) व राजेश दराडे (Rajesh Darade) यांना दोन आरोपी कदमवाकवस्ती  गावच्या हद्दीत दोन जण चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी आले आहेत. (Pune Crime)

 

 

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे सोन्याचे दागिने आढळून आले. आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सोन्याचे दागिने शिरुर तालुक्यातील (Shirur Taluka) कोरेगाव (Koregaon) गावच्या हद्दीतून चोरल्याची कबुली दिली. आरोपींकडून रांजणगाव पोलीस ठाणे (Ranjangaon Police Thane) आणि अहमदनगर जिल्ह्यातील सुपा पोलीस ठाण्यात (Supa Police Station) दाखल असलेले गुन्हे उघडकीस आले आहेत.
आरोपींकडून 1 लाख 42 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना रांजणगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil),
सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi) ,
पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे (Police Inspector Subhash Kale)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजु महानोर (API Raju Mahanor) ,
पोलीस हवालदार नितीन गायकवाड, अमित साळुंखे,
संभाजी देविकर, श्रीनाथ जाधव, राजेश दराडे, शैलेश कुदळे, बाजीराव वीर यांच्या पथकाने केली.

 

Web Title :  Pune Crime | Loni Kalbhor police arrested two persons involved in chain snatching and seized Rs 1.5 lakh

 

हे देखील वाचा :

Omicron च्या धोक्यादरम्यान Bus किंवा Auto ने प्रवास करत असाल तर व्हा सावध ! कोरोनाचा धोका ‘या’ 6 पद्धतीने करा कमी

Pune Crime | पोलीस असल्याची बतावणी करुन लुटणाऱ्या इराणी टोळीच्या वाकड पोलिसांनी आवळल्या मुसक्या, 6 लाखाचा मुद्देमाल जप्त

Raj Thackeray | CM उद्धव ठाकरेंच्या निर्णयाचं राज ठाकरेंकडून स्वागत; म्हणाले – ‘आता कच खाऊ नका..’

 

Related Posts