IMPIMP

Atal Pension Yojana (APY) | मोदी सरकार दरमहिना तुमच्या खात्यात ट्रान्सफर करेल 5000 रुपये; लवकर जाणून घ्या स्कीम ?

by nagesh
atal pension yojana apy atal pension yojana apy get 5k rupees every month central modi government scheme

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाAtal Pension Yojana (APY) | केंद्र सरकार (Central Government) कडून देशातील सर्व घटकांसाठी अनेक विशेष योजना राबविण्यात येत आहेत. आज आम्ही तुम्हाला मोदी सरकारच्या (Modi Government) अशाच एका स्कीमबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला मासिक 5000 रुपये मिळतील, पण जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला दुप्पट म्हणजेच पूर्ण 10,000 रुपये मिळतील. हे पैसे दर महिन्याला तुमच्या खात्यात जमा होतील. (Atal Pension Yojana (APY))

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अटल पेन्शन योजना Atal Pension Yojana (APY)

या योजनेचे नाव अटल पेन्शन योजना असे आहे. यामध्ये तुम्हाला दरमहा पेन्शनची सुविधा दिली जाते. या योजनेत पती – पत्नी दोघेही पैसे मिळवू शकतात. याशिवाय सरकारच्या या योजनेचा लाभ कोणीही घेऊ शकतो. केंद्र सरकारच्या या जबरदस्त पेन्शन योजनेबद्दल जाणून घेवूयात –

 

कोणीही घेऊ शकतो लाभ
अटल पेन्शन योजना ही मोदी सरकारची लोकप्रिय योजना आहे, ज्यामध्ये प्रत्येक महिन्याला 1000 ते 5000 रुपयांपर्यंतची रक्कम नागरिकांना दिली जाते. पती – पत्नी दोघांनीही या योजनेत अर्ज केल्यास त्यांना 10,000 रुपयांचा लाभ मिळेल. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने म्हटले आहे की या योजनेअंतर्गत पती आणि पत्नी दोघेही रू. 5000 च्या पेन्शन रकमेसाठी अर्ज करू शकतात.

 

दरमहा भरावा लागेल प्रीमियम
या योजनेत नागरिकांना दरमहा प्रीमियमची रक्कम भरावी लागते. अर्जदार 18 वर्षांचा असल्यास, त्याला दरमहा 210 रुपये प्रीमियम भरावा लागेल. दुसरीकडे हेच पैसे दर तीन महिन्यांनी दिल्यास 626 रुपये आणि सहा महिन्यांनी दिल्यास 1,239 रुपये द्यावे लागतील. याशिवाय दरमहा 1000 रुपये पेन्शन मिळवण्यासाठी वयाच्या 18 व्या वर्षी फक्त 42 रुपये द्यावे लागतील.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

60 वर्षापूर्वी मृत्यू झाल्यास कुणाला मिळणार पैसे ?

जर कोणत्याही कारणास्तव नागरिकाचा वयाच्या 60 वर्षापूर्वी मृत्यू झाला तर या अटल पेन्शन योजनेचे पैसे नागरिकाच्या पत्नीला दिले जातील. कोणत्याही कारणास्तव पती – पत्नी दोघांचा मृत्यू झाल्यास या पेन्शनचे पैसे नामनिर्देशित व्यक्तीला दिले जातील.

 

वयाच्या 42 व्या वर्षापर्यंत करू शकता गुंतवणूक
तुम्ही यामध्ये मासिक, त्रैमासिक आणि सहामाही गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्हाला वयाच्या 42 वर्षापर्यंत गुंतवणूक करावी लागेल. 42 वर्षात तुमची एकूण गुंतवणूक 1.04 लाख रुपये असेल. 60 वर्षांनंतर तुम्हाला 5000 रुपये मासिक पेन्शन मिळेल. प्राप्तीकर कलम 80CCD अंतर्गत, त्याला कर सवलतीचा लाभ मिळतो.

 

कुठे उघडू शकता खाते
तुम्ही एका सदस्याच्या नावाने फक्त 1 खाते उघडू शकता. या योजनेत तुम्ही बँकेतून खाते उघडू शकता. पहिल्या 5 वर्षांसाठी योगदानाची रक्कमही सरकार देईल.

 

Web Title :- atal pension yojana apy atal pension yojana apy get 5k rupees every month central modi government scheme

 

हे देखील वाचा :

Sleep Quality | बिछान्यावर पडताच सेकंदात येईल गाढ झोप, अवलंबा ‘या’ 7 नॅचरल टिप्स; जाणून घ्या

Dhananjay Munde | ‘राज ठाकरे बोलक्या भावल्यांच्या कार्यक्रमातील अर्धवटराव’; धनंजय मुंडेंची जहरी टीका

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! महागाई भत्त्यात (DA) 13 टक्के वाढ होणार

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात किंचित घट, चांदी ‘जैसे थे’; जाणून घ्या आजचे दर

 

Related Posts