IMPIMP

Pune Crime | दोन दिवस राष्ट्रध्वज उतरवलाच नाही, मुख्याध्यापकावर FIR तर 3 शिक्षकांचे निलंबन

by nagesh
Pune Crime | national flag not hoisted for two days crime against headmaster suspension of three teachers

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त (Maharashtra Din) राज्यात ध्वजवंदन करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) प्रत्येक शाळेत देखील ध्वजवंदनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. मात्र, भोर तालुक्यातील सावरदरे (Savardare Bhor Taluka) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत (Zilla Parishad school) फडकवण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचा (National Flag) अवमान केल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळेत फडकविण्यात आलेला ध्वज त्याच दिवशी सायंकाळी न उतरवता दोन दिवस त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकाविरुद्ध (Headmaster) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. तर तीन शिक्षकांना निलंबित (Teachers Suspended) करण्यात आले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

संजय पापळे (Sanjay Papale) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. तर प्रवीण नांदे (Praveen Nande), शीतल टापरे (Sheetal Tapre), अहमद पटेल (Ahmed Patel) अशी निलंबित करण्यात आलेल्या शिक्षकांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावरदरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महाराष्ट्र दिनानिमित्त सकाळी राष्ट्रध्वज फडकवला होता. नियमाप्रमाणे सायंकाळी 5 वाजता सन्मानपूर्वक उतरवायला हवा होता. परंतु मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या बेफिकिरीमुळे त्यादिवशी राष्ट्रध्वज उतरवण्यात आला नाही. (Pune Crime)

दुसऱ्या दिवशी रात्रं – दिवस ध्वज तसाच होता. याची माहिती मिळताच राजगड पोलीस ठाण्यातील (Rajgad Police Station) अधिकाऱ्यांनी 3 मे रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास राष्ट्रध्वज उतरवला आणि राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल केला.

 

तात्काळ निलंबनाची कारवाई
गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे (Ashwini Sonawane) यांनी संबंधित शिक्षकांचा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांना सादर केला.
त्यानंतर गटविकास अधिकारी विशाल तनपुरे (Vishal Tanpure) यांनी मुख्याध्यापकासह तीन प्राथमिक शिक्षकांना निलंबित केले.
याचा अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) यांना पाठवला आहे.
तसेच भोर पंचायत समितीकडून सरपंच आणि ग्रामसेवकांना नोटीस काढली आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | national flag not hoisted for two days crime against headmaster suspension of three teachers

 

हे देखील वाचा :

Koregaon Bhima Violence Case | कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडेविरोधात पुरावे शोधायला हवेत – रामदास आठवले

Former MLA Mohan Joshi | ‘5 वर्षाच्या कारभारात पुणे गेले खड्ड्यात; भाजप शिष्टमंडळाची भेट निव्वळ स्टंटबाजी’ – मोहन जोशी

Kirit Somaiya on Sanjay Raut | ‘संजय राऊत म्हणजे मुख्यमंत्री ठाकरेंचा भोंगा, हिम्मत असेल तर..’ – किरीट सोमय्या

 

Related Posts