IMPIMP

Pune Crime News | एजंट कडून फायनान्स कंपनीला 25 लाखांचा गंडा, शिवाजीनगर परिसरातील घटना

by sachinsitapure
Cheating Fraud Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | कर्ज देण्याच्या बहाण्याने अनेकांची आर्थिक फसवणूक (Fraud) केली जात आहे. अशा घटना पुणे शहरामध्ये घडत असताना एका एजंटने फायनान्स कंपनीची (Finance Company) 24 लाख 65 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार मे 2022 ते आजपर्यंत शिवाजीनगर येथील इंक्रेड फायनान्स सर्व्हिसेस लि. (InCred Financial Services Limited) येथे घडला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत अकबर दावल व्हनवाड Akbar Dawal Vanwad (वय-38 रा. मातोश्री बिल्डिंग, शेवाळवाडी, हडपसर) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन अमोल अशोक कोळी Amol Ashok Koli (रा. अयोध्या पार्क, देशपांडे राम मंदिराजवळ, धायरी) याच्यावर आयपीसी 420, 409, 418, 471, 474 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची शिवाजीनगर येथील प्राईड हॉटेलच्या (Pride Hotel) मागे
इंक्रेड फायनान्स सर्व्हिसेस लि. नावाची कंपनी आहे. कंपनीमार्फत ग्राहकांना मागणी केल्याप्रमाणे कर्ज दिले जाते.
आरोपी अमोल कोळी हा फिर्यादी यांच्या फायनान्स कंपनीत एजंट म्हणून काम करत आहे. त्याने कंपनीच्या नावाचा वापर करुन तसेच कंपनीच्या नावाचे खोटे बनावट दस्तऐवज तयार केले. याद्वारे कोळी याने कंपनीची व ग्राहकांची सुमारे 24 लाख 65 हजार 865 रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे (PSI Shinde) करीत आहेत.

Related Posts