IMPIMP

Pune Crime News | लोणीकंद पोलिस स्टेशन : वाघोलीत वाईन शॉपवर रात्री 11.30 वाजता ‘राडा’; तरुणाच्या डोक्यात घातली बियरची बाटली

by sachinsitapure
Pune Crime News | a beer bottle placed on the head of a young man asking to borrow beer in the wagholi incident a dispute arose due to the breaking of the glass of the hotel

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन –  Pune Crime News | वाईन्सच्या दुकानात (Wine Shop In Wagholi) येऊन त्याने उधार बियर मागितली. तेथील कर्मचार्‍यांनी ती देण्यास नकार दिल्याने त्याने हॉटेलच्या काचेवर दगड मारले. त्याचा राग येऊन कर्मचार्‍यांनी उधार बियर मागणार्‍या तरुणाच्या डोक्यातच बिअरची बाटली फोडून जखमी केले. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत आकाश गोरख मेमाणे (वय ३०, रा. केसनंद रोड) याने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६१०/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विकी, आकाश, वैभव, गुड्डू या सागर वाईन्समधील (Sagar Wines In Wagholi) कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार केसनंद रोडवरील सागर वाईन्समध्ये बुधवारी रात्री साडेअकरा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, आकाश मेमाणे हा सागर वाईन्समध्ये गेला होता. त्याने उधार बियर मागितली. तेथील कर्मचार्‍यांनी ती न दिल्याने त्याचा वाद झाला. तेव्हा फिर्यादीचा पाठलाग करुन विकी याने फिर्यादीच्या डोक्यात बियरची बाटली मारुन जखमी केले. इतरांनी काठीने मारहाण (Beating) करुन दुखापत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. (Pune Crime News)

याविरोधात प्रशांत ज्ञानेश्वर लिंबोरे (वय ३२, रा. केसनंद) यांनी लोणीकंद पोलिसांकडे फिर्याद (गु. रजि. नं. ६११/२३) दिली आहे.
त्यानुसार आकाश गोरख नेमाणे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
आकाश नेमाणे हा सागर वाईन्समध्ये आला. त्याने उधार बियर मागितली.
फिर्यादी यांनी ती देण्यास नकार दिल्याने त्याचा राग मनात धरुन हॉटेलचे
काचेवर दगड मारुन तसेच फिर्यादी यांच्या डाव्या हाताच्या दंडावर वार करुन जखमी केले. पुन्हा उधार दारु दिली नाही तर तुझ्याकडे बघुन घेईन, अशी धमकी दिली. लोणीकंद पोलिस तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | a beer bottle placed on the head of a young man asking to
borrow beer in the wagholi incident a dispute arose due to the breaking of the glass of the hotel

हे देखील वाचा

Related Posts