IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : समर्थ पोलिस स्टेशन – महिला आशिलाला धमकावल्याच्या आरोपावरून वकिलावर गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime News | A case has been registered against the lawyer Rajendra Tambe on the charge of threatening a female client

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | दिवाणी न्यायालयात (Pune Civil Court) दाखल केलेल्या विविध केसेसची कागदपत्रे मागण्यासाठी गेलेल्या महिला अशिलाला अश्लिल शिवीगाळ करुन त्यांना धमकाविण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी (Pune Police) वकिलावर गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

अ‍ॅड. राजेंद्र तांबे Adv. Rajendra Tambe (रा. तांबे वाडा, मंगळवार पेठ) असे या वकिलाचे नाव आहे. याप्रकरणी एका ६४ वर्षाच्या महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १२५/२३) दिली आहे. हा प्रकार अ‍ॅड. तांबे यांच्या कार्यालयात २१ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता घडला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी अ‍ॅड. राजेंद्र तांबे यांच्या मार्फत दिवाणी न्यायालयात विविध केसेस दाखल केल्या होत्या.
या केसेसचे कागदपत्रे मागण्यासाठी फिर्यादी या तांबे यांच्या कार्यालयात गेल्या होत्या.
त्यावेळी फिर्यादी व अ‍ॅड. राजेंद्र तांबे यांच्यात वादावादी झाली.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

तेव्हा अ‍ॅड. तांबे यांनी फिर्यादी यांना अश्लिल बोलून तूला पाया पडायला भाग पाडील.
मी वकिल आहे. तू माझे काही वाकडे करु शकत नाही.
तुला जीवे मारुन टाकील व तपास लागू देणार नाही, असे बोलून फिर्यादीचे मनास लज्जा उत्पन्न केली
असे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस उपनिरीक्षक मिरा त्र्यंबके (PSI Meera Trimbake) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | A case has been registered against the lawyer Rajendra Tambe on the charge of threatening a female client

Related Posts