IMPIMP

Pune Crime News | ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

by nagesh
Pune Crime News | A gang preparing to rob a jeweler’s shop is jailed

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | हडपसर येथील सराफी दुकाने बंद होण्यापूर्वी त्यांच्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या (Pune Police Crime Branch Unit 5) पथकाने जेरबंद केले आहे. (Pune Crime News)

गणेश बबन लोंढे Ganesh Baban Londhe (वय २३, रा. तरवडे वस्ती, महमंदवाडी – Tarwade Vasti Mahmandwadi), निरंजन दिपक ननवरे Niranjan Deepak Nanware (वय १९, रा. सोलापूर – Solapur), माऊली बंडु लोंढे Mauli Bandu Londhe (वय २१, रा. हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे साथीदार रोहेल जावेद शेख Rohail Javed Shaikh (रा. हडपसर), बच्चनसिंग जोगिंदरसिंग भोंड (Bachchan Singh Joginder Singh Bhond) आणि संगतसिंग अजमेरसिंग कल्याणी Sangat Singh Ajmer Singh Kalyani (रा. रामटेकडी) हे तिघे पळून गेले असून त्यांच्यावर दरोड्याच्या तयारी असल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून दोन कोयते, एक स्क्रु ड्रायव्हर, मिरची पावडर, नायलॉनची दोरी अशा वस्तू जप्त केल्या आहेत.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

पोलीस नाईक विनोद शिवले (Police Constable Vinod Shivale) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ९७७/२३) दिली आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
शहरातील गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गुन्हे शाखेच्या युनिट ५ चे पथक गस्त घालत असताना माळवाडी रोडवर एका झाडाखाली काही जण दबा धरुन बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार हे पथक तुपे सभागृहाजवळ गेले. तेव्हा बाजूला एका झाडाखाली सहा जण बसलेले दिसून आले. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांची चाहुल लागून त्यातील तिघे जण पळून गेले. पोलिसांनी तिघांना पकडले.

त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी तेथून काही अंतरावर असलेल्या गणेश ज्वेलर्स हे दुकान
(Ganesh Jewelers Shop) बंद होण्याच्या अगोदर दुकानात घुसून तेथील सोन्या चांदीचे दागिने
(Gold and Silver Jewellery), रोकड व इतर वस्तू लुटण्याकरीता ते जाणार होते,
असे सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | A gang preparing to rob a jeweler’s shop is jailed

Related Posts