IMPIMP

Pune Crime News | रणजित रामगुडेबरोबर फिरतो म्हणून तरुणावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

by nagesh
Pune Crime News | Hand broken by juvenile gang after stabbing it with a coyote; A shocking incident in Katraj after reporting to the police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | विरोधी टोळीतील गुंडाबरोबर फिरतो, या कारणावरुन एका टोळक्याने तरुणाच्या डोक्यात, पाठीवर वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी दोघांना अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

गणेश प्रकाश जाधव (वय १९) आणि अजय प्रकाश डिगे (वय २०, दोघे रा. बाणेर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे साथीदार तन्मय शितोळे (वय १८, रा. पाषाण), मयुर मेढे (वय १९) यांच्यासह त्यांच्या एका अल्पवयीन साथीदारावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. रतन सुग्रीव माने (वय २१) हा या घटनेत जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

 

याबाबत सुग्रीव शिवाजी माने (वय ५२, रा. सुतारवाडी, पाषाण) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४८/२३) दिली आहे. ही घटना बाणेर रोडवरील गणराज चौकात सोमवारी रात्री दहा वाजता घडली. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा रतन हा सोमवारी सायंकाळी घरी आला.
तेव्हा त्याने फिर्यादी यांना सांगितले की, पाषाण सूस रोडवर त्यांच्या ओळखीचा तन्मय शितोळे व इतरांनी अडवून
तू रणजित रामगुडे या गुंडाबरोबर का फिरतो, तुला जास्त मस्ती आली आहे, या पुढे तू त्याचे बरोबर दिसला तर
तुला बघतोच अशी धमकी दिली. त्यानंतर काही वेळाने रतन दुचाकीवरुन घरातून बाहेर गेला.
रतन दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी बाणेर रोडवरील गणराज चौकात आला असताना त्याला शितोळे व इतरांनी अडवले.
शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यांनी लोखंडी हत्याराने रतन याच्या डोक्यात, पाठीवर सपासप वार केले. त्यात तो जखमी झाल्यावर ते पळून गेले.
त्यानंतर रतन याला प्रथम औंध हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथून त्याला ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

रणजित रामगुडे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याबरोबर फिरतो, म्हणून विरोधी टोळक्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सहायक पोलीस निरीक्षक केंद्रे तपास करीत आहेत.

 

Web Title :-  Pune Crime News | As Ranjit walks with Ramgude, he tries to kill the young man by stabbing him

 

हे देखील वाचा :

Pune Fire News | मंगळवार पेठेतील जुन्या बाजारातील दुकानांना आग; आगीत १० दुकाने भस्मसात

Pune Crime News | पुण्यातील सारसबागेत आढळली बेवारस बॅग, परिसरात प्रचंड खळबळ

Palak Tiwari | पलक तिवारीच्या नव्या फोटोने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

 

Related Posts