IMPIMP

Pune Crime News | व्हॉर्न वाजविल्याने चाकूने वार करुन कारचालकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

by nagesh
Attempt to kill

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | रात्री उशिरा चौकात फटाके वाजविणार्‍याने व्हॉर्न वाजविला म्हणून कारचालकावर चाकूने वार करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत सलीम हुसेन शेख (वय ५२, रा. डेक्कन टॉवर, कॅम्प) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १६५/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आयान मैनुद्दीन कुरेशी Ayan Mainuddin Qureshi (वय २०, रा. भीमपूरा, कॅम्प) याला अटक केली आहे. हा प्रकार कॅम्पातील कुरेशी मस्जिद (Qureshi Masjid) चौकात शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कारने घरी जात होते.
यावेळी आयान कुरेशी हा कुरेशी मस्जिद चौकात फटाके वाजवत होता.
त्यामुळे त्यांनी गाडी पुढे नेता यावी, यासाठी व्हॉर्न वाजविला.
त्याचा राग येऊन आयान याने फिर्यादी यांना तू व्हॉर्न क्यो बजाता है, तेरेको बहोत मस्ती चढी है क्या असे म्हणून चाकूने त्यांच्यावर सपासप वार करुन गंभीर जखमी केले. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन आयान कुरेशी याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Attempted stabbing to death of car driver after honking the horn

Related Posts