IMPIMP

GST Council Meet | औषध, खाद्यपदार्थ स्वस्त तर गाडी घेणं महागलं; GST बैठकीत काय स्वस्त आणि काय महाग? जाणून घ्या

by nagesh
GST Council Meet | gst counsil 50th meet decisions nirmala sitharaman gst council meet gst on online gaming gst changes cancer medicine know which things became cheap and which became expensive

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जीएसटी कौन्सिलची बैठक (GST Council Meet) पार पडली. या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय मंगळवारी (दि.11) जाहीर करण्यात आले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक (GST Council Meet) झाली आणि यामध्ये ऑनलाइन गेमिंगला (Online Gaming) जीएसटी अंतर्गत आणणं, 28 टक्के कर लागू करणं आणि कर्करोगाच्या औषधांवरुन (Cancer Medicines) IGST काढून टाकण्यासारखे महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

जीएसटी कौन्सिलच्या बैठकीमध्ये (GST Council Meet) कोणत्या वस्तूंवर दिलासा देण्यात आला आणि काय महागलं, जाणून घ्या…

ऑनलाईन गेमिंगवर GST

GST कौन्सिलच्या बैठकीत ऑनलाईन गेमिंग, हॉर्स रेसिंग (Horse Racing), कॅसिनोच्या (Casino) संपूर्ण किमतीवर 28 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाईन गेमिंगला जीएसटी कायद्याच्या कक्षेत आणण्यात आले आहे. ऑनलाईन गेमिंगवर जीएसटी लावण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सागंतलं की, या विषयावर सविस्तर चर्चा करुन हा निर्णय घेतला आहे. चर्चेदरम्यान आजच्या काळात ऑनलाइन गेमिंग उद्योगाचा प्रभाव आणि त्यातून किती उत्पन्न मिळू शकते, या बाबत राज्यांशी चर्चा करुन हा निर्णय घेतला आहे.

कार घेणं महागणार

जीएसटी कौन्सिलने कार खरेदी (Car Expensive) करणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. सेडान कार (MUVs) वर 22 टक्के कंपनसेशन सेस (Compensation Cess) लावण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. जी 28 टक्के जीएसटी व्यतिरिक्त असेल. याचाच अर्थ आता या श्रेणीतील वाहन खरेदी करताना अधिक खर्च करावा लागणार आहे. दरम्यान सेडान कारवर (Sedan Cars) 22 टक्के सेस लागू होणार नसल्याचे निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट केलं.

https://twitter.com/PIB_India/status/1678982218742644736?s=20

 

कर्करोगाचे औषध स्वस्त

आता आयात केलेल्या कर्करोगाच्या औषधांवर जीएसटी लावला जाणार नाही. त्यामुळे ही औषधं आता स्वस्त होणार आहेत. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत कर्करोगावरील औषधं Dinutuximab ची आयात स्वस्त होईल, अशी अपेक्षा आधीच व्यक्त केली जात होती. त्याला सरकारने मंजुरी दिली आहे. सध्या यावर 12 टक्के जीएसटी आकारला जातो, तो आता शून्यावर आणला आहे. या औषधाच्या एका डोसची किंमत 63 लाख रुपये आहे.

चित्रपट गृहातील खाद्यपदार्थ स्वस्त

चित्रपट गृहांमध्ये खाद्यपदार्थ महाग असल्याची तक्रार आहे. मात्र आता खाण्या-पिण्याच्या वस्तू स्वस्त होणार आहेत.
याबाबत माहिती देताना महसूल सचिव संजय मल्होत्रा (Revenue Secretary Sanjay Malhotra) म्हणाले,
सिनेमागृहांमधील खाण्यापिण्याच्या वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
बैठकीपूर्वी सिनेमागृहामध्ये उपलब्ध खाद्यपदार्थ आणि शीतपेय यांच्यावर 18 टक्के जीएसटी आकारला जात होता. आता 5 टक्के करण्यात आला आहे.

हे खाद्यपदार्थ स्वस्त

जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत न शिजवलेल्या वस्तूंवरील जीएसटी 18 टक्क्यांवरुन 5 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
म्हणजेच, आता कच्चा किंवा न तळलेल्या गोष्टी स्वस्त झाल्या आहेत.
तसेच इमिटेशन, जरीच्या धाग्यावरील कर 12 टक्क्यांवरुन 5 टक्के केला आहे.

Web Title : GST Council Meet | gst counsil 50th meet decisions nirmala sitharaman gst council meet gst on online gaming gst changes cancer medicine know which things became cheap and which became expensive

Related Posts