IMPIMP

Pune Crime News | पुण्यातील सिंहगड रोड पोलिस स्टेशनमधून बांग्लादेशी चोरटयांचे पलायन

by nagesh
Pune Crime News | Bangladeshi thieves escape from Sinhagad Road Police Station in Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | चोरीच्या गुन्हयात शिक्षा (Punishment For Theft) भोगून येरवडा कारागृहामधून (Yerwada Jail) बाहेर आलेल्या 2 बांग्लादेशी नागरिकांनी सिंहगड रोड पोलिस स्टेशनच्या (Sinhagad Road Police Station) आवारातून पलायन केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, याप्रकरणी पलायन करणार्‍या बांग्लादेशी नागरिकांविरूध्द (Bangladeshi Citizens) परदेशी नागरिक कायद्यान्वये (Foreigners Act) गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. (Pune Crime News)

पलायन केलेल्या दोघा बांग्लादेशींना न्यायालयाने चोरीच्या गुन्हयात शिक्षा ठोठावली होती. येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती. ते दोघेही बेकायदेशीररित्या पुण्यात वास्तव्यास असल्याने त्यांना पुणे पोलिसांच्या (Pune Police) विशेष शाखेने (Special Branch Police Pune) परत (Deportation) बांग्लादेशात पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली होती. दरम्यान, त्यांना रिस्ट्रीक्शन ऑर्डर (Restriction Order) देण्यात आली होती. त्यानुसार ते दोघेही गेल्या 7 महिन्यांपासून सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये राहत होते. पोलिसांकडून त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात येत होती. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

विशेष शाखेने बांग्लादेशी दूतावासाशी संपर्क साधला होता, पण, दुतावासाने विशेष शाखेच्या पोलिसांना
(Pune Police SB) प्रतिसाद दिला नसल्यामुळे दोघे बांग्लादेशी पोलिस स्टेशनमध्ये वास्तव्यास होते.
दि. 7 जून 2023 रोजी त्यांनी पोलिस स्टेशनमधून पलायन केले आहे.

Web Title : Pune Crime News | Bangladeshi thieves escape from Sinhagad Road Police Station in Pune

Related Posts