IMPIMP

Pune Crime News | चैन चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

by sachinsitapure
Bharti Vidhyapeeth Police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | दुचाकीवरुन पुण्यात येणाऱ्या जोडप्याची दुचाकीवरुन चैन खेचून (Chain Snatching) पळून गेलेल्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्हा उघडकीस आणून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही घटना 20 नोव्हेंबर रोजी कात्रज घाटात घडली होती. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत सुरेश मारुती खोपडे (रा. खोपडेनगर, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidhyapeeth Police Station) फिर्याद दिली होती. (Pune Crime News) मुदस्सर सादिक सय्यद (वय-19), रंगनाथ उर्फ रंग्या दिलीप गायकवाड (वय-23 दोघे रा. पाथर्डी, जि. नगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकातील अंमलदार धनाजी धोत्रे, हर्षल शिंदे सचिन गाडे यांना आरोपीबाबत माहिती मिळाली. तसेच आरोपी हे अहमदनगर जिल्ह्यातील रेकॉर्डवरील असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपींना सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून चोरलेली चैन व दुचाकी असा एकूण दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारावाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), अतिरिक्त कार्यभार सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे
(IPS Ramnath Pokale), अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीणकुमार पाटील
(IPS Praveen Kumar Patil), पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil),
सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Senior PI Vinayak Gaikwad), पोलीस निरीक्षक गुन्हे विजय पुराणीक
(PI Vijay Puranik), पोलीस निरीक्षक गुन्हे गिरीश दिघावकर (PI Girish Dighavkar),

सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता, पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, चेतन गोरे,
महेश बारावकर, आशिष गायकवाड, राहुल तांबे, हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, मितेश चोरमले, अभि चौधरी,
अभि जाधव, विक्रम सावंत, निलेश जमदाडे यांच्या पथकाने केली.

Related Posts