IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चंदननगर पोलिस स्टेशन – जेवायला देणार्‍या ज्येष्ठ महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन लुटले

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station – Elderly lady serving food robbed with death

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | घरी साफसफाईचे काम करणार्‍याने भुक लागली म्हटल्यावर एक माऊली त्याला जेवण देत होती. त्याने मात्र साथीदारांच्या मदतीने जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) देऊन अंगावरील दागिने, रोकड जबरदस्तीने लुटून नेली. (Pune Crime News)

याबाबत वडगाव शेरी येथील एका ७५ वर्षाच्या महिलेने चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये (Chandannagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २०६/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शुभम सोनवणे (वय १८, रा. वडगावशेरी – Vadgaon Sheri) व त्यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे. ही घटना १६ मे रोजी रात्री साडेआठ वाजता घडली. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने त्यांच्या ओळखीच्या शुभम याला १२ मे रोजी घरातील पेटिंगचे व साफ सफाईचे कामाकरीता बोलावले होते.
त्याने काम पूर्ण केले. उरलेले काम करण्यासाठी त्याला दुसर्‍या दिवशी बोलावले होते.
परंतु, तो आला नाही. १६ मे रोजी रात्री साडेआठ वाजता तो दोन साथीदारांना घेऊन आला. आई गावी गेली आहे.
मला भूक लागली आहे, मला जेवण द्या असे म्हणाला.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

त्यामुळे फिर्यादी या त्याला जेवण देत असताना अचानक त्याने व त्याच्या साथीदारांनी फिर्यादी यांना बेडवर ढकलले.
त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या अंगावरील २२ ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख असा ८३ हजार रुपयांचा
ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. सहायक पोलीस निरीक्षक घोरपडे तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Chandannagar Police Station – Elderly lady serving food robbed with death threats

हे देखील वाचा

Supreme Court On Maharashtra Bull Cart Racing | सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ! बैलगाडा शर्यतीला परवानगी,
आता सर्ज्या-राजाची जोडी पुन्हा उधळणार

Pune Traffic Police News | पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्याकडून पैसे गोळा करणाऱ्या
2 पोलिस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई; जाणून घ्या प्रकरण (Video)

Pune News | FSI वरुन भाजपने पेठांमध्ये राहाणाऱ्यांची फसवणूक केली, भाजपने पुणेकरांवर सूड उगवला; काँग्रेसचा घणाघात

Pune News | FSI वरुन भाजपने पेठांमध्ये राहाणाऱ्यांची फसवणूक केली, भाजपने पुणेकरांवर सूड उगवला; काँग्रेसचा घणाघात

Chandrakant Patil | नागरिकांच्या समस्या आठ दिवसांत सोडवून अहवाल सादर करा; चंद्रकांत पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Related Posts