IMPIMP

Pune News | FSI वरुन भाजपने पेठांमध्ये राहाणाऱ्यांची फसवणूक केली, भाजपने पुणेकरांवर सूड उगवला; काँग्रेसचा घणाघात

by nagesh
Pune News | BJP cheated Peth residents over FSI, Congress accuses BJP

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune News | पुण्यातील पेठांमधील बांधकामाला असलेला 1.50 एफएसआय बदलून तो 2 एफएसाय (FSI) करण्याचे आश्वासन सरकारने निवडणुकीच्या वेळी दिले होते. मात्र, सरकारने पुन्हा एकदा पेठांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप काँग्रेसने (Pune News) केला आहे. आधी घरपट्टी आता साईड मार्जीन व एफएसआय वरुन पुणेकरांची फसवणूक करत भाजपने (BJP) सूड उगवला असल्याचा आरोप काँग्रेसचे (Pune Congress) नेते मोहन जोशी (Mohan Joshi), आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) आणि संजय बालगुडे (Sanjay Balgude) यांनी केला आहे.

पुण्याचा विकास आराखडा (Pune Development Plan) 2013-14 मध्ये प्रकाशित करण्यात आला होता. त्यावेळी गावठाण भागात विशेषत: पेठांमध्ये बांधकामाला 1.50 एफएसआय करण्यात आला. मात्र याला विरोध करत मोर्चा काढून हा विषय सभागृहात मांडण्यात (Pune News) आला होता. त्यावेळी राज्य सरकारने (State Government) हरकती सूचना मागवल्या होत्या. 1.50 एफएसआय पुण्यातील नागरिकांवर अन्याकारक असल्याची हरकत व सूचना त्यावेळी केली होती.

पुण्यातील जुन्या वाड्यात राहणाऱ्या भाडेकरुंचे पुर्नववस करण्यासाठी तसेच वाड्यांचा विकास करण्यासाठी 2.50 एफएसआय द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. भाजपने 2015 मध्ये मनपाकडून विकास आराखडा स्वत:च्या ताब्यात घेऊन तो प्रकाशित केला. मात्र, त्यामध्ये गावठाण भागात 1.50 एफएसआय ठेवण्यात आला. भाजपने (BJP) निवडणुकी दरम्यान जुन्या वाड्यांचा विकास करण्यासाठी 2 एफएसआय देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सरकारने पेठांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच यामुळे पुण्यातील वाड्यांचा विकास होणे अवघड असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

वाडे व पेठांमधील घरांच्या विकासाला एक मीटर साईड मार्जीन (Side Margin) सोडावे लागणार असल्याचे
समान विकास नियमावलीत (U.D.C.P.R) 2020 मध्ये नमूद केले होते. ही अट रद्द करण्याचे आश्वासन भाजपने
दिले होते. कसबा पोटनिवडणुकीत ( Pune Kasba Peth Bypoll Election) देखील भाजपकडून याबाबत
आश्वासन देण्यात आले होते. मात्र साईड मार्जीनची अट अद्याप तशीच ठेवण्यात आली आहे.
त्यामुळे जुन्या पुण्याचा विकास ठप्प होणार आहे. पुणेकरांनी भाजपला 100 नगरसेवक चार आमदार व एक
खासदार दिला. त्या पुणेकरांवर भाजपने सुड उगवल्याची घणाघाती टीका काँग्रेसने केली आहे.

Web Title :  Pune News | BJP cheated Peth residents over FSI, Congress accuses BJP

Sunny XI Cup Championship Cricket Tournament | ‘सनी इलेव्हन करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा;
आर्यन क्रिकेट क्लब संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश !!

Pune Crime News | दत्तवाडी पोलिसांकडून मोक्कातील फरारी आरोपीला अटक

Vision Cup Under-15 Cricket Tournament | ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद १५ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा; लायन्स् इलेव्हन, लेपर्डस् इलेव्हन, जॅग्वॉस इलेव्हन, लिंक्स् इलेव्हन उपांत्य फेरीत !!

Related Posts