IMPIMP

Sunny XI Cup Championship Cricket Tournament | ‘सनी इलेव्हन करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; आर्यन क्रिकेट क्लब संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश !!

by nagesh
unny XI Cup Championship Cricket Tournament | 'Sunny XI Cup' Championship Cricket Tournament; Aryan Cricket Club team enters semi-final!!

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – सनी इलेव्हन तर्फे आयोजित ‘सनी इलेव्हन करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत (Sunny XI Cup Championship Cricket Tournament) हरी सावंत याची अचूक गोलंदाजी आणि यशराज खाडे आणि कौशल तांबे यांच्या फलंदाजीच्या जोरावर आर्यन क्रिकेट क्लब संघाने न्युट्रीलिशियस् संघाचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

सहकारनगर येथील शिंदे हायस्कूल मैदानावर झालेल्या उपांत्यपुर्व फेरीच्या सामन्यात आर्यन संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्युट्रीलिशियस् संघाने डावाची चांगली बांधणी करत २० षटकात १८३ धावांचे आव्हान उभे केले. श्रेयस वालेकर याने ५१ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ८२ धावांची खेळी केली. याशिवाय हृषीकेश राऊत (३७ धावा) आणि मीझान सय्यद (३३ धावा) यांनी धावा जमविल्या. हरी सावंत याने १७ धावात ३ गडी बाद करून अचूक गोलंदाजी केली.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

आर्यन क्रिकेट क्लब संघाने हे आव्हान १९.४ षटकात व ८ गडी गमावून पूर्ण केले. कौशल तांबे आणि पुरंजय सिंग राठोड
(२३ धावा) या सलामीवीरांनी सावध सुरूवात करून दिली. तिसर्‍या गड्यासाठी कौशल तांबे आणि यशराज खाडे
या दोघांनी ४० चेंडूत ६९ धावांची भागिदारी करून संघाचा विजयाचा पाया रचला. यशराज याने २९ चेंडूत ९ चौकारांसह ५१ धावांची तर, कौशल तांबे याने ३९ धावांची खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः उपांत्यपुर्व फेरीः
न्युट्रीलिशियस्ः २० षटकात ४ गडी बाद १८३ धावा (श्रेयस वालेकर नाबाद ८२ (५१, ७ चौकार, ५ षटकार),
हृषीकेश राऊत ३७, मीझान सय्यद ३३, हरी सावंत ३-१७) पराभूत वि. आर्यन क्रिकेट क्लबः १९.४ षटकात ८ गडी
बाद १८४ धावा (यशराज खाडे ५१ (२९, ९ चौकार), कौशल तांबे ३९, अक्षय काळोखे २४, पुरंजय सिंग राठोड २३,
आत्मन पोरे ३-१७, पियुष साळवी २-२६); सामनावीरः हरी सावंत;

Web Title :  Sunny XI Cup Championship Cricket Tournament | ‘Sunny XI Cup’
Championship Cricket Tournament; Aryan Cricket Club team enters semi-final!!

Vision Cup Under-15 Cricket Tournament | ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद १५ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा;
लायन्स् इलेव्हन, लेपर्डस् इलेव्हन, जॅग्वॉस इलेव्हन, लिंक्स् इलेव्हन उपांत्य फेरीत !!

Pune Crime News | दत्तवाडी पोलिसांकडून मोक्कातील फरारी आरोपीला अटक

ACB Trap News | 2.50 लाख रुपये लाच घेताना वन परिमंडळ अधिकारी व खासगी व्यक्ती अ‍ॅन्टी करप्शनच्या ताब्यात

Related Posts