IMPIMP

Pune Crime News | विश्रांतवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत दहशत निर्माण करणार्‍या सराईत गुन्हेगारावर MPDA, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची आतापर्यंतची 15 वी कारवाई

by nagesh
Pune Crime News | Commissioner of Police Ritesh Kumar's 15th MPDA action so far against Pune Criminals; Action On Nitesh Sadbhaiya of Vishrantwadi Police Station limits

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | विश्रांतवाडी पोलिस स्टेशनच्या (Vishrantwadi Police Station) हद्दीत दहशत निर्माण करणार्‍या अट्टल गुन्हेगारावर पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये (MPDA Act) कारवाई केली आहे. रितेश कुमार यांनी पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्विकारल्यापासुनची ही 15 वी कारवाई केली आहे. (Pune Crime News)

 

नितेश सुनिल सदभैय्या Nitesh Sunil Sadbhaiya (21, रा. सर्व्हे नं. 106, कतारवाडी, भैरवनाथ मंदिराशेजारी, येरवडा) असे कारवाई केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. नितेश हा त्याच्या साथीदारांसह विश्रांतवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत लोखंडी कोयता, लोखंडी फायटर, रॉड या सारख्या जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, घातक हत्याराने दुखापत, दंगा करणे आणि बेकायदा हत्यारे बाळगणे असे गंभीर गुन्हे करत होता. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मागील 5 वर्षामध्ये त्याच्याविरूध्द 4 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे त्याच्याविरूध्द तक्रार करत नव्हते. विश्रांतवाडी पोलिसांकडून आलेला एमपीडीए प्रस्तावाची छाननी केल्यानंतर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी नितेश सुनिल सदभैय्या याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करत त्याची रवानगी नागपूर मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) केली आहे. पोलिस आयुक्तांनी त्याच्याविरूध्द 1 वर्षाकरिता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत.

 

विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय भापकर (Sr PI Dattatraya Bhapkar)
आणि पीसीबीच्या (PCB) वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेखा वाघमारे (Sr PI Surekha Waghmare)
यांनी एमपीडीएचा प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडे पाठविला होता.
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पदभार स्विकारल्यापासुन आतापर्यंत 15 सराईतांवर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई केलेली आहे.

 

Web Title : Pune Crime News | Commissioner of Police Ritesh Kumar’s 15th MPDA action so far against Pune Criminals; Action On Nitesh Sadbhaiya of Vishrantwadi Police Station limits

 

हे देखील वाचा :

Maharashtra Cabinet Decision | शेतकऱ्यांना मोठा दिलासा, सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Prashant Damle | अखिल भारतीय नाट्य परिषद निवडणूक : प्रशांत दामले यांचा भरघोस मतांनी विजय

WhatsApp New Feature | WhatsApp ने आणले नवे भन्नाट ‘चॅट लॉक फिचर’

 

Related Posts