IMPIMP

WhatsApp New Feature | WhatsApp ने आणले नवे भन्नाट ‘चॅट लॉक फिचर’

by nagesh
WhatsApp New Feature | whatsapp feature privacy feature just dropped

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – WhatsApp New Feature | व्हॉट्सॲप हा इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफोर्म जगविख्यात आणि सुप्रसिद्ध अॅप आहे. मेटा ही पेरेटीन कंपनी असलेल्या व्हॉट्सॲपने नवे युनिक फिचर (WhatsApp New Feature) लॉन्च केले आहे. व्हॉट्सअॅप कंपनीने यूजर्सची समस्या लक्षात घेत, एक भन्नाट प्रायव्हसी फिचर (WhatsApp New Feature) आणले आहे. या फिचरमुळे युजर्सची प्रायव्हसी (User Privacy) अधिक क्षमतेने जपता येणार आहे. WhatsApp ने Chat Lock हे प्रायव्हसी फिचर आणत असल्याचे त्यांच्या ट्विटरवरून द्विट करत जाहीर केले आहे.

व्हॉट्स अॅप हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. गेल्या काही दिवसांत अनेक नवनवीन फिचर्सस् आणि अपडेट्स वापरकर्त्यांच्या सोयीसाठी आणले आहेत. व्हॉट्सअॅपने नुकतेच हे चॅट लॉक Chat Lock हे फिचर आणत असल्याचे जाहीर केले आहे. या नवीन फिचरमुळे युजर्सना चॅटिंगमध्ये वैशिष्ट गोपनीयता बाळगता येणार आहे. युजर्स या फिचरचा वापर करून त्यांचे खासगी आणि वैयक्तिक संभाषणे पासवर्ड व बायोमेट्रिक्ससह लॉक करू शकणार आहेत. यामुळे व्हॉट्सअॅपमधील (WhatsApp New Feature) तुमचे वैयक्तिक मेसेज कोणीलाही तुमच्या परवानगी शिवाय वाचता येणार नाहीत. या प्रायव्हसी फिचरमुळे तुम्ही तुमचा फोन सहज कोणाच्याही हातात निसंकोचपणे देऊ शकता, असे कंपनीने या ट्विटमध्ये (Twitter) म्हटले आहे.

या फीचरमध्ये (WhatsApp New Feature) कंपनी आणखी अपडेट्स आणू शकते. हे फिचर लोकांची प्रायव्हसी आणसी सुरक्षित करण्यासाठी रोलआऊट करण्यात आले आहे. तसेच हे फिचर iOS आणि Android या दोन्ही यूजर्ससाठी देण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

काही स्टेप्स फॉलो करा अन् ‘Chat Lock’ फिचर अनुभवा

 

 

१. प्रथम व्हॉट्सअॅप अपडेट करा.

२. WhatsApp ओपन करा, ज्या व्यक्ती किंवा ग्रुपचे चॅट तुम्हाल लॉक करायचे आहे त्यावर क्लिक करा. ज्या व्यक्तीचे किंवा ग्रुपचे चॅट लॉक करायचे आहेत, त्याच्या प्रोफाइल चित्रावर टॅप करा.

३. अदृश्य मेसेज मेन्यूच्या खालच्या बाजूला तुम्हाला ‘chat lock’ हा ऑप्शन दिसेल, त्यावर पुन्हा क्लिक करा. • यानंतर तुमच्या व्हॉट्सअॅपमध्ये चॅट लॉक वैशिष्ट्य सक्षम होईल.

४. पुढे तुमचा फोन पासवर्ड किंवा बायोमेट्रिक्स वापरून हे फिचर तुमच्या व्हॉट्सअॅपवर कार्यरत होईल.

 

 

लॉक केलेल्या चॅट्समध्ये असा करा प्रवेश

१. लॉक केलेल्या चॅट्समध्ये प्रवेश करण्यासाठी WhatsApp मुख्यपृष्ठावर खाली स्वाइप करा.
२. यानंतर तुम्ही लॉक केलेल्या चॅट लॉकची लिस्ट मिळेल,

 

पुढे तुम्हाला ज्या चॅट लॉक केलेल्या व्यक्ती किंवा ग्रुपच्या व्हॉट्स अॅप चॅटमध्ये प्रवेश करायचा आहे. त्यावर तुम्ही जाऊ शकता.

 

Join Our

SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

 

 

Web Title :  WhatsApp New Feature | whatsapp feature privacy feature just dropped

 

Maharashtra Politics News | ‘अजितदादा… दंगलीचा मास्टरमाईंड तुमच्या समोर बसलेला’, भाजप आमदाराचा खळबळजनक आरोप (व्हिडिओ)

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : वानवडी पोलिस स्टेशन – खंडणी देण्यास नकार दिल्याने पान टपरीचालकाच्या
कुटुंबाला गुंडांची मारहाण; बांबुने मारहाण करुन पत्नीचा केला हात फॅक्चर

Trimbakeshwar Temple Case | त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेल्या ‘त्या’ प्रकाराबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय, तर पोलीस म्हणतात…

Related Posts