IMPIMP

Pune Crime News | मार्केटयार्डमध्ये पिस्तुलाचा धाक दाखवून 28 लाख रुपये लुटणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त रितेश कुमार यांची 5 वी कारवाई

by nagesh
Pune Crime News | 6th action by Commissioner of Police Ritesh Kumar against 'Mokka', criminal Karthik Ingwale and his gang in Warje Malwadi.

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Crime News | मार्केट यार्ड परिसरात दिवसाढवळ्या पिस्तुलाचा धाक दाखवून 28 लाख रुपयांचा दरोडा (Robbery) टाकणाऱ्या अविनाश रामप्रताप गुप्ता व त्याच्या 12 साथीदारांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई (MCOCA Action) Mokka करण्यात आली आहे. आरोपींनी 12 नोव्हेंबर 2022 रोजी कार्यालयात घसून दरोडा टाकला होता. पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr) यांनी पदभार स्वीकारल्यापासून पाच टोळ्यांवर मोक्का कारवाई (Pune Crime News) केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

टोळी प्रमुख अविनाश रामप्रसाद गुप्ता (वय-20 रा. शिंदे पुल, शिवणे, पुणे), आदित्य अशोक मारणे (वय-28 रा. वारजे माळवाडी), अजय बापु दिवटे (वय-23 रा. रामनगर, वारजे), निलेश बाळु गोठे (वय-20 रा. मंगळवार पेठ, पुणे), विशाल सतिश कसबे (वय-20 रा. मंगळवार पेठ, पुणे), दिपक ओमप्रकाश शर्मा (वय-19 रा. राहुल नगर, शिवणे, पुणे), गुरुजन सिंग सेवासिंग विरग (वय-22 रा.पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे), संतोष बाळू पवार (वय-23 रा. पानशेत रोड, खानापूर, ता. हवेली), साई राजेंद्र कुंभार (वय-19 रा. मु.पो. खानापुर, ता. हवेली), एक विधीसंघर्षित बालक व फरार तीन आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. (Pune Crime News)

 

अविनाश गुप्ता टोळीने अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्याच्या उद्देशाने धमकी देऊन, जुलुम जबरदस्ती, खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), गंभीर दुखापत, मारामारी, विना परवाना शस्त्र बाळगणे, जाळपोळ, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे करुन नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे पुन्हा केले आहेत.

 

मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) दाखल असलेल्या गुन्ह्यात मोक्का
कलमाचा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे
(Senior Police Inspector Anagha Deshpande) यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 विक्रांत देशमुख
(DCP Vikrant Deshmukh) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा
(Addl CP Ranjan Kumar Sharma) यांच्याकडे पाठवला होता.
कागदपत्रांची पडताळणी करुन आरोपींवर मोक्का कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.
पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे (ACP Pornima Taware) करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख,
सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे,
पोलीस निरीक्षक गुन्हे सविता ढमढेरे (Police Inspector Savita Dhamdhere),
सहायक पोलीस निरीक्षक रामदास मुंढे (API Ramdas Mundhe), पोलीस उपनिरीक्षक चेतन भोसले
(PSI Chetan Bhosale), सर्व्हेलन्स पथकातील पोलीस अंमलदार विरेंद्र ढवाण,
अमरनाथ लोणकर यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- Pune Crime News | Commissioner Ritesh Kumar’s 5th action against ‘Mokka’ gang who looted Rs 28 lakh at market yard

 

हे देखील वाचा :

Nitin Deshmukh | किरीट सोमय्या यांच्यावर नितीन देशमुख यांची खालच्या भाषेत टीका; म्हणाले…

Anil Desai | ‘उद्या शिंदे गटाचे वकील मीच मुख्य नेता असल्याचे म्हणतील..,’ अनिल देसाई यांची शिंदे गटावर टीका

Maharashtra Politics | काँग्रेस नेत्याकडून नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंना लिहिले पत्र

 

Related Posts