IMPIMP

Pune Crime News | दत्तवाडी पोलिसांकडून लुटीचा बनाव करून बिल्डरचे 22 लाख 65 हजार रूपये लंपास करणार्‍याला अटक

by nagesh
Pune Crime News | Duttwadi police arrested the person who faked loot and looted 22 lakh 65 thousand rupees from the builder

पुणे :सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | लुटीचा बनाव करून बिल्डरची (Builder In Pune) आणि पोलिसांची दिशाभूल 22 लाख 65 हजार रूपये लंपास करणार्‍याला दत्तवाडी पोलिसांनी (Dattawadi Police Station) अटक केली आहे. लंपास केलेल्या रक्कमेपैकी 22 लाख 44 हजार रूपये आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. (Pune Crime News)

बसप्पा वाल्मिक शिंगरे (Basappa Valmik Shingre) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शिंगरे हा एका बिल्डरकडे कामाला आहे. बिल्डरने त्याला 22 लाख 65 हजार रूपये कार्यालयात पोहचविण्यासाठी दिले होते. मात्र, तो गायब झाला होता. त्यामुळे बिल्डरने शिंगरे याच्याविरूध्द विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये (Vishrambaug Police Station) गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, शिंगरे रात्री उशिरा बिल्डरकडे परतला आणि त्याने त्यास दत्तवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत निलायम पुलाशेजारी (Nilayam Bridge) चार चोरट्यांनी लुटल्याचे सांगितले. (Pune Crime News)

 

बिल्डरने तात्काळ दत्तवाडी पोलिस स्टेशन गाठले आणि हकीकत सांगितली. दत्तवाडी पोलिस स्टेशनमध्ये शिंगरेला लुटल्याप्रकरणी अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर शिंगरे राहत असलेल्या लॉ कॉलेज रोडपासुन विश्रामबाग पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पेपर गल्ली ते दत्तवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील निलायम पुल आणि स्वारगेट (Swargate) पासुन कोथरूड-भुगाव (Kothrud Bhugaon) रस्त्यावरील सुमारे 100 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची (CCTV Camera) पडताळणी केली. पोलिसांनी शिंगरे याच्याकडे सखोल तपास केला. तो तपासादरम्यान वेगवेगळ्या पोलिसांना वेग-वेगळी उत्तरे देत असल्याने त्याच्या सांगण्यात विसंगती आढळून आली. अखेर त्याने आपल्यावर कर्ज झाल्यामुळे आपण लुटीचा बनाव केला असल्याचे कबुल केले. पोलिसांनी चोरी गेलेल्या रक्कमेपैकी 22 लाख 44 हजार आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे.

अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil),
सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे (ACP Rajendra Galande),
वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे (Sr PI Jayram Paigude), पोलिस निरीक्षक (गुन्हे)
विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास
पथकातील पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे (PSI Chandrakant Kamthe),
पोलिस हवालदार कुंदन शिंदे, पोलिस अंमलदार अमित सुर्वे,
पोलिस प्रशांत शिंदे, पोलिस काशिनाथ कोळेकर, पोलिस अनुप पंडीत, पोलिस
प्रमोद भोसले, पोलिस अनिस तांबोळी,
पोलिस पुरूषोत्तम गुन्ला, पोलिस नवनाथ भोसले, पोलिस अमोल दबडे, पोलिस दयानंद तेलंगे पाटील, पोलिस सद्दाम शेख, पोलिस अमित चिव्हे, पोलिस ज्ञानेश्वर शिंदे आणि पोलिस किशोर वळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :  Pune Crime News | Duttwadi police arrested the person who faked loot and looted 22 lakh 65 thousand rupees from the builder

 

हे देखील वाचा :

Deepak Kesarkar | ‘राऊतांना विचारा, अलिशान घरे, गाड्या, संपत्ती कोठून आले?’, दीपक केसरकरांचा राऊतांवर पलटवार

MLA Sanjay Shirsat | ‘संजय राऊत हा असा चमत्कार जो नसबंदी झाल्यावरही…’, संजय शिरसाटांची जहरी टीका

National Service Scheme (NSS) Pune | सामाजिक जाणीव निर्मितीचा उपक्रम अधिक सशक्त करण्याची गरज – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Pune Traffic Police | नो पार्किंगला गाडी लावताय तर सावधान; वाहतूक पोलिसांकडून बसेल मोठा भुर्दंड

 

Related Posts