IMPIMP

Pune Crime News | येरवडा कारागृहात सापडले आणखी 4 मोबाइल हॅन्डसेट

by nagesh
Pune Crime News | four-mobile-handsets-were-again-found-in-yerwada-jail

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पंधरा दिवसांपूर्वी येरवडा कारागृहात (Yerwada Jail) मोबाईल सापडल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर पुन्हा येरवडा कारगृहात चार मोबाईल हॅन्डसेट सापडल्याचा (Mobile Phones Found In Jail) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कैद्याकडून छुप्या पद्धतीने मोबाईल हॅन्डसेट वापरले जात असल्याचे समोर आल्यानंतर कारागृह प्रशासनाकडून स्मार्ट कार्ड मोबाईल योजना (Smart Card Mobile Scheme) सुरु केली. (Pune Crime News) ही योजना सुरु झाल्यानंतर देखील येरवडा कारागृहाच्या आवारात पुन्हा चार मोबाईल सापडले आहेत. यामुळे कारागृहाची कडक सुरक्षा भेदून मोबाईल आतमध्ये गेलेच कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

याबाबत कारागृह अधिकारी वीरु खळबुटे Jail Officer Veeru Khalbute (वय-37) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद दिली आहे. येरवडा कारागृहातील माडी गेट आणि अंतर्गत भिंतीत चार मोबाइल संच लपवून ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. चार मोबाइल हॅन्डसेट सापडल्याने कारागृह सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. (Pune Crime News)

 

मिळालेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहाला पाठीमागील बाजूला प्रवेशद्वार आहे. याच प्रवेशद्वारासमोर कारागृह कर्मचाऱ्यांची वसाहत (Jail Staff Colony) आहे. तेथून काही अंतरावर कारागृहाचे मुद्रणालय (Prison Press) आहे. कारागृहाच्या आवारात मंगळवारी सुरक्षा रक्षक गस्त घालत होते. त्यावेळी मुद्रणालयाच्या परिसात उंच सीमा भिंतीतील एका कप्प्यात चार मोबाईल आढळून आले. तीन मोबाईलमध्ये सीम कार्ड सापडले आहे. या प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

 

Web Title :  Pune Crime News | four-mobile-handsets-were-again-found-in-yerwada-jail

 

Related Posts