IMPIMP

Maharashtra Police News | नशेबाजाकडून दोन पोलिसांना जबर मारहाण

by sachinsitapure
Indiranagar Police Station

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Police News | कौटुंबिक भांडणातून पायाला जखम करुन घेत पोलीस ठाण्यात (Nashik Police) आलेल्या एका रक्तबंबाळ युवकाला मदत करणे पोलिसांना चांगलेच महागात पडले आहे. इंदिरानगर येथील पोलिसांनी रक्तबंबाळ युवकाला पोलीस वाहनातून जिल्हा रुग्णालयात नेत असताना नशेबाज जखमी युवकाने पोलिसांकडे सिगारेट मागितली. मात्र पोलिसांनी त्याला सिगारेट देण्यास नकार दिल्याने त्याने दोन पोलिसांना वाहनातच मारहाण (Beating) केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. (Maharashtra Police News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याप्रकरणी मुज्जफर उर्फ मुज्जु सुलतान कुरेशी (वय-36 रा. घरकुल वसाहत, वडाळा) याच्यावर इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी (दि.4) घडला आहे. याबाबत पोलीस नाईक नितीनचंद्र गौतम (Police Naik Nitin Chandra Gautam) यांनी फिर्याद दिली आहे. (Maharashtra Police News)

आरोपी कुरेशी हा कौटुंबिक भांडणातून जखमी होऊन पोलीस ठाण्यात आला. तिथे त्याने मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घातला. यावेळी त्याचा पाय रक्तबंबाळ झाल्याने संपुर्ण पोलीस ठाण्यात रक्ताचा सडा पडला होता. यामुळे त्याच्यावर उपचार करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक एस.एम. साळी (API S.M. Sali), पोलीस नाईक नितीनचंद्र गौतम व वाहनचालक निवृत्ती माळी (Nivritti Mali) आणि पोलीस हवालदार मुकेश ढवळे (Police Constable Mukesh Dhawale) हे जिल्हा रुग्णालयात जात होते. त्यावेळी त्याने वाटेत पोलिसांकडे सिगारेटची मागणी केली.

पोलिसांनी सिगारेट देण्यास नकार दिल्यानंतर त्याने वाहन थांबवून सिगारेट पाजा, असे म्हणत गोंधळ घालण्यास
सुरुवात केली. पोलिसांनी सिगारेट देण्यास असमर्थता दर्शविल्याने त्याचा राग मनात धरुन त्याने शेजारी बसलेल्या
गौतम यांचा पाठीमागून उजव्या हाताने ताकदीने गळा कवळीत धरुन आवळला. त्यामुळे त्यांचा श्वास रोखला गेला.
त्यावेळी ढवळे हे सोडवण्यासाठी गेले असता आरोपीने त्यांच्याही छातीत जोरदार ठोसा मारला.

त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने त्यांची प्रकृती बिघडली.
त्यामुळे वाहन चालकाने दोघांना जवळच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.
तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
गौतम यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

Related Posts