IMPIMP

Pune Crime News | सहजयोग ध्यान शिबीरात चोरट्याने नजर चुकवून गंठण नेले चोरुन

by sachinsitapure
crime

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | आंबेगाव येथील सहज ध्यान शिबीरासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील सव्वा लाख रुपयांचे सोन्याचे गंठण मोटरसायकलवरुन आलेल्या चोरट्याने हिसकावून चोरुन नेले. (Pune Crime News)

याबाबत शेवाळवाडीतील एका ५८ वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १३३/२४) दिली आहे. हा प्रकार आंबेगाव येथील मुंबई बंगलुरु महामार्गावरील राधाकृष्ण गार्डन समोर रविवारी दुपारी एक वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या श्री माताजी निर्मला देवी यांचा सहजयोग ध्यान धारणेचा कार्यक्रम असल्याने त्या आल्या होत्या. त्यावेळी मोटारसायकलवरील चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सव्वा लाख रुपयांचे २५ ग्रॅम सोन्याचे गंठण जबरदस्तीने चोरुन नेले. सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करीत आहेत.

Related Posts