IMPIMP

Pune Crime News | कोंढवा पोलिस स्टेशन – शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्यास सांगून दहा लाखांची फसवणूक

by nagesh
Pune Crime News | Kondhwa Police Station – Fraud of 10 lakhs by asking to Investment In Share Market

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास १० टक्के नफा १० महिन्यात देण्याचे (Investment In Share Market)
आमिष दाखवून ९ लाख ६१ हजार २०० रुपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी कोंढव्यातील एका ३२ वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५६५/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी येस बँक अकाऊंटधारकासह (Yes Bank Account Holders) तिघांवर गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे़ हा प्रकार १ मे २०२२ ते ३१ जुलै २०२२ दरम्यान घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एकाने फोन करुन शेअर मार्केटमध्ये (Stock Market News) पैसे गुंतविल्यास १० टक्के नफा व १० टक्के मुळ रक्कम १० महिन्यात देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार फिर्यादी यांनी ९ लाख ६१ हजार २०० रुपये गुंतविले. मात्र, १० महिने झाल्यानंतरही नफा किंवा मुळ रक्कम न देता त्यांची फसवणूक (Fraud Case) केली. पोलीस निरीक्षक संजय मोगले (PI Sanjay Mogale) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Kondhwa Police Station – Fraud of 10 lakhs by asking to Investme
nt In Share Market

Related Posts