IMPIMP

Reshma Punekar | बारामतीच्या रेश्मा पुणेकर यांना राज्य सरकारचा ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ जाहीर

by nagesh
Reshma Punekar | Reshma Punekar of Baramati announced the ‘Shiv Chhatrapati State Sports Award’ by the state government

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Reshma Punekar | आंतरराष्ट्रीय बेसबॉल सामन्यात भारतीय संघाची कर्णधार पदाची (Indian Baseball Team Captain) धुरा सांभाळणाऱ्या रेश्मा पुणेकर (Reshma Punekar) यांना महाराष्ट्रातील सर्वोच्च क्रिडा पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. मुळच्या बारामतीच्या असणाऱ्या रेश्मा पुणेकर यांना महाराष्ट्र राज्य सरकारचा ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ (Shiv Chhatrapati State Sports Award) जाहीर झाला आहे.

या पुरस्कारासाठी अनेकांच्या नावांची शिफारस केली जात होती, मात्र रेश्मा यांच्या उत्तुंग कामगिरीमुळे त्यांना राज्य सरकार (Maharashtra State Government) तर्फे या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. या पुरस्कारासाठी काही गोष्टी ग्राह्य धरल्या जातात. त्यामध्ये 30 जून रोजी संपणारे वर्ष धरून त्या पूर्वीच्या पाच वर्षांपैकी तीन वर्षांमध्ये त्या खेळाडूचे राज्य, राष्ट्रीय (National) व आंतरराष्ट्रीय (International) स्तरांवर केलेल्या कामगिरीचे व क्रीडानैपुण्याचे मूल्यमापन केले जाते. यावरुन हा पुरस्कार जाहीर होतो.

अगदी खेड्यागावातून ते देशाच्या कर्णधार पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या रेश्मा यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. रेश्मा पुणेकर यांनी अगदी बिकट आर्थिक परिस्थितीशी झुंज देत जिद्द, आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे स्थान मिळवले आहे. त्यांनी आत्तापर्यंत दोन आंतरराष्ट्रीय सामने, चीन (China) आणि हॉंगकॉंग (Hong Kong) मध्ये खेळले आहेत. 23 व्या राष्ट्रीय सामन्यात महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. 28 राज्यस्तरीय सामन्यांमध्ये 4 सुवर्ण पदक (Gold medal), 6 रौप्य पदक (Silver Medal), 3 कांस्य पदक (Bronze Medals) पटकावले आहे. या आधी त्यांना रागिणी पुरस्कार (Ragini Award), राज्यस्तरीय खेलरत्न पुरस्कार (State Level Khel Ratna Award), सरदार धुळोजी मोरे वीरता पुरस्कार (Sardar Dhuloji More Valor Award) अशा पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.

त्यांची 12 वर्षाची खेळातील उपासना व मेहनत इतर महिलांना खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात येण्यासाठी प्रेरणा देणारी आहे.
त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे केवळ बारामतीचेच (Baramati) नव्हे तर भारताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर बेसबॉलमध्ये उंचावले आहे.

रेश्मा पुणेकर (Reshma Punekar) या सध्या पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU)
शारीरिक शिक्षण विभागात (Department of Physical Education)
एम. पी. एड पदवीचा (M. P. Ed Degree)
अभ्यास करत आहेत. ग्रामीण भागातील आंतरराष्ट्रीय खेळाडूला महाराष्ट्र राज्य सरकारचा सर्वोच्च शिव छत्रपती
राज्य क्रीडा पुरस्कार (Shiv Chhatrapati State Sports Award 2023) जाहीर झाल्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Web Title : Reshma Punekar | Reshma Punekar of Baramati announced the ‘Shiv Chhatrapati State Sports Award’ by the state government

Related Posts