IMPIMP

Pune Crime News | लष्कर पोलिस स्टेशन – पोलिसात तक्रार मागे घेण्यासाठी रुग्णवाहिका चालकाला बेदम मारहाण

by nagesh
Pune Crime News | Lashkar Police Station – Ambulance driver brutally beaten for withdrawing pune police complaint

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पोलिसात (Pune Police) केलेली तक्रार मागे नाही तर तुला मारणार अशी धमकी देऊन रुग्णवाहिका चालकाला (Ambulance Driver) लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण (Beating) करण्यात आली. (Pune Crime News)

याप्रकरणी विजय प्रेमनाथ ठोकळे (वय ३९, रा. सावली क्वॉटर्स, जुना मोदीखाना, कॅम्प) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १२१/२३) दिली आहे. त्यानुसार अदित्य भोसले (मन्या) Aditya Bhosle (Manya) (रा. भवानी पेठ) आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा First Information Report (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सरदार वल्लभभाई पटेल कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटलगेटजवळ (Sardar Vallabhbhai Patel Cantonment General Hospital) ३ जून रोजी सायंकाळी पावणेसात वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी हे रुग्णवाहिकेवर शासकीय नोकरी करत असताना हॉस्पिटलच्या गेटजवळ बसले होते. त्यावेळी आरोपी तेथे आला व त्याने फिर्यादी यांना “तु माझ्याविरोधात पोलिसांत तक्रार का केली. तू तक्रार मागे घे नाही तर तुला मी मारणार” असे म्हणत धमकी देऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण फिर्यादी यांना जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक कांबळे (PSI Kamble) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Lashkar Police Station – Ambulance driver brutally beaten for withdrawing pune police complaint

Related Posts