IMPIMP

Pune Crime News | लोणी काळभोर पोलीस स्टेशन – पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान स्टेज कोसळून 1 ठार 3 जखमी

by nagesh
Pune Crime News | Loni Kalbhor Police Station – 1 killed and 3 injured in a stage collapse during a Bailgada Sharyat Bullock Cart Race in Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पुण्यात अनेक ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे (Bullock Cart Race) आयोजन केले जात आहे. घाटातील शर्यत पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. लोणी काळभोर हद्दीत बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या बैलगाडा शर्यतीला गालबोट लागले आहे. बैलगाडा शर्यतीदरम्यान स्टेज कोसळून (Stage Collapsed) 1 ठार तर 3 गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना (Pune Crime News) रामदऱ्या जवळ रविवारी (दि.4) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

बाळासाहेब काशिनाथ कोळी Balasaheb Kashinath Koli (वय-46 रा. निनाम पाडळी, सातारा) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर शुभम विजय लोखंडे Shubham Vijay Lokhande (वय-24 रा. संगमनेर, ता. भोर), मयूर प्रमोद लोखंडे Mayur Pramod Lokhande (वय-25) आणि विकास वाल्मीक ढमाळे Vikas Valmik Dhmale (वय-24 रा. पिंपरी वळण ता. राहुरी) अशी जखमी झालेल्या तीन जणांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या (Loni Kalbhor Police Station) हद्दीत वडकी गाव येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस (Heavy Rain) आणि वादळ सुरु झाले. त्यामुळे लोकांची एकच धांदल उडाली.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

पाऊस लागू नये यासाठी स्टेजच्या खाली मृत आणि जखमी बसले होते.
पावसामुळे स्टेजच्या लोखंडी पायऱ्यांचे रील चिखलात खचल्याने
एका बाजूला पडले. यामध्ये 4 जण गंभीर जखमी झाले.
त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
त्यामध्ये बाळासाहेब कोळी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Web Title : Pune Crime News | Loni Kalbhor Police Station – 1 killed and 3 injured in a
stage collapse during a Bailgada Sharyat Bullock Cart Race in Pune

Related Posts