IMPIMP

Pune Crime News | लोणी काळभोर पोलिस स्टेशन : माजी सरपंचाविरूध्द विनयभंग, अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime News | Loni Kalbhor Police Station: A case of molestation, atrocity filed against former sarpanch

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | घराच्या मिळकतीमध्ये बेकायदेशीर वारस लावल्याबद्दल चौकशी लावण्याबाबत अर्ज केल्यानंतर चौकशी सुरू झाल्याचा राग मनात धरून महिलेचा विनयभंग (Molestation Case) केल्याप्रकरणी माजी सरपंचाविरूध्द (Former Sarpanch) लोणी काळभोर पोलिस स्टेशनमध्ये (Loni Kalbhor Police Station) विनयभंग, अ‍ॅट्रॉसिटीचा (Atrocity Act)गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

विठ्ठल राजाराम शितोळे Vitthal Rajaram Shitole (रा. कोरेगाव मुळ, पुणे – Koregaon Mul Pune) असे
गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. यासंदर्भात 26 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक महिती अशी की,
फिर्यादी यांनी माजी सरपंच विठ्ठल राजाराम शितोळे यांच्याविरूध्द घराच्या मिळकतीमध्ये बेकायदेशीर वारस लावल्याबद्दल चौकशी लावण्याबाबत अर्ज केला होता. सदरील अर्जाची चौकशी सुरू झाल्यानंतर त्याचा राग मनात ठेवुन शितोळेने दि. 5 मे 2023 रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी या पायी जात असताना त्यांना ओढुन माझ्या गाडीत बस व कपडे काढ असे बोलुन विनयभंग केला. फिर्यादी या अनुसूचीत जातीच्या आहेत हे माहित असताना देखील त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. (Pune Crime News)

 

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

घडलेल्या प्रकाराबाबत फिर्यादीचे वडिल शितोळे याच्याकडे जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांना देखील
दमदाटी केली. त्यामुळे विठ्ठल शितोळे याच्याविरूध्द विनयभंग आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त बजरंग देसाई (ACB Bajrang Desai) करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Loni Kalbhor Police Station: A case of molestation, atrocity filed against former sarpanch

  1. Pune Crime News | विश्रामबाग पोलिस स्टेशन : पतीनेच सासू आणि त्यांच्या मित्राचे फोटो मार्फ करुन बनवले नग्न फोटो,
    नातेवाईकांना पाठवून केला विनयभंग
  2. Retired ACP Shamsher Khan Pathan Dies | सेवानिवृत्त एसीपी शमशेर खान पठाण यांचं निधन, निवृत्तीनंतर स्थापन केला होता स्वतःचा राजकीय पक्ष
  3. 2000 Rupees Note |  नोटबंदीच्या निर्णयाप्रमाणे हा निर्णयही बालिश, पृथ्वीराज चव्हाणांची मोदी सरकारवर टीका
  4. ACB Trap News | 1 हजाराची लाच घेताना महिला पोलिस हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Related Posts