IMPIMP

Pune Crime News | विश्रामबाग पोलिस स्टेशन : पतीनेच सासू आणि त्यांच्या मित्राचे फोटो मार्फ करुन बनवले नग्न फोटो, नातेवाईकांना पाठवून केला विनयभंग

by nagesh
Pune Crime News | Vishrambaug Police Station: Husband made naked photos of mother-in-law and her friend by morphing them, sent them to relatives and molested them

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाईन –  Pune Crime News | पतीने आपली सासू व तिचा मित्राचे चेहरे वापरुन नग्न फोटो (Nude Photos) तयार करुन ते नातेवाईकांना पाठवून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत विश्रामबाग पोलिसांनी (Vishrambaug Police Station) एकावर आयटी अ‍ॅक्टसह (IT Act) विनयभंगाचा (Molestation Case) गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे.

याबाबत आरोपीच्या पत्नीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १०२/२३) दिली आहे. हा प्रकार मार्च ते १८ मे २०२३ दरम्यान घडला.

 

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा पती सध्या वेगळे रहात आहेत.
फिर्यादीच्या पतीने त्यांच्या मोबाईलवर अश्लिल टेक्स्ट मेसेज केला.
तसेच फिर्यादीची आई व आईचा मित्र यांचे चेहरे वापरुन नग्न फोटो तयार केले.
ते फिर्यादी व फिर्यादी यांच्या आत्याचे मोबाईलवर पाठवून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल,असे कृत्य केले,
म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक गायकवाड (Police Inspector Gaikwad) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Vishrambaug Police Station: Husband made naked photos of mother-in-law and her friend by morphing them, sent them to relatives and molested them

Related Posts