IMPIMP

Pune Crime News | पावसाळ्यात ट्रेकला जाताय… सावधान! ट्रेकला गेलेला तरुण पाण्यात गेला वाहून; जुन्नर येथील घटना (Video)

by nagesh
Pune Crime News | monsoon trekking group stuck in flood water malshej ghat kalu waterfall trekking video viral

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पावसाळा सुरु झाल्यानंतर अनेकांजण ट्रेकला (Monsoon Trekking) जाण्याचा बेत आखत असतात. पुणे जिल्ह्यात ट्रेकसाठी अनेक ठिकाण आहे. या ठिकाणावर पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. मात्र अति उत्साह काहीवेळा जीवावर बेतू शकतो. असा एक प्रकार पुणे जिल्ह्यातील (Pune Crime News) जुन्नर येथे घडला आहे. एका पर्यटन स्थळावर (Tourist Spot) फिरायला गेलेला एक तरुण पर्यटक पुराच्या पाण्यात वाहून गेला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Video Viral On Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

पुणे जिल्ह्यातील जुन्नर (Junnar) येथील एका पर्यटनस्थळावर फिरण्यासाठी गेलेले काही पर्यटक पुराच्या पाण्यामुळे अडकल्याची घटना रविवारी घडली. अचानक आलेल्या पावसामुळे पुराच्या पाण्याचा (Flood Water) जोर वाढला आणि अनेक पर्यटक अडकून पडले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (Pune Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्यातील माळशेज घाटाजवळ (Malshej Ghat) असलेल्या काळू वॉटरफॉल (Kalu Waterfall) येथे ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. एका ओढ्यामध्ये पाण्याचा जोर वाढल्यामुळे काही पर्यटकांना परत येण्यासाठी अडथळा निर्माण झाला. तर तेथील स्थानिक लोकांनी या पर्यटकांना मदत केली. मात्र, मदत करणारा एक तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

वाहून गेलेला तरुण सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे.
तर या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
ट्रेकिंगला जाताना असा खोडसाळपणा करणे किंवा अति शहाणपणा करणे जिवावर बेतू शकते असे नेटकऱ्यांनी मत व्यक्त केले आहे.

Web Title : Pune Crime News | monsoon trekking group stuck in flood water malshej ghat kalu waterfall trekking video viral

Related Posts