IMPIMP

Pune Crime News | बंडगार्डन पोलिसांकडून कुठलाही पुरावा नसताना ‘मर्डर’ करणार्‍याचा पर्दाफाश ! पतीकडे शरीर सुखाची मागणी केल्याने केली ‘गेम’

by nagesh
Bund Garden Police Station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन –  Pune Crime News | पुणे शहर पोलिस दलातील बंडगार्डन पोलिस ठाण्यातील (Bundgarden Police Station) अधिकारी आणि पोलिस अंमलदारांनी कुठलाही पुरावा नसताना तसेच डेड बॉडीची ओळख पटली नसताना देखील खुनातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मयताने आरोपीच्या पत्नीकडे शरीर सुखाची मागणी केल्याने आरोपीने त्याचा गळा दाबुन आणि डोक्यात दगड मारून खून केल्याची कबुली दिली आहे. (Pune Crime News)

सुरज लल्ली आगवान Suraj Lalli Agwan (35, मुळ रा. राजपुर, जि. कानपुर, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 14 जून 2023 रोजी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास रेल्वे क्वार्टस लगत एका 30-35 वर्षीय अनोळखी पुरूषाची डेडबॉडी आढळून आली होती. मयताच्या डोक्यात दगड घालुन जीवे ठार मारून मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहरा विद्रुप करून पुरावा नष्ट करण्यात आला होता. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

बंडगार्डन पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये दि. 13 जून 2023 रोजी मालधक्का चौकाच्या जवळ असलेल्या समाधान देशी दारूच्या बाजुला असलेल्या सीसीटीव्हीमध्ये (CCTV) एक महिला मयताशी बोलताना दिसुन आली. त्यानंतर पोलिसांनी महिलेचा शोध घेण्यास सुरूवात केली. दि. 5 जुलै 2023 रोजी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी महिला मिळून आली. पोलिसांनी तिच्याकडे सखोल चौकशी केली असता तिने मयताने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली होती आणि त्यानंतर तिच्या पतीने त्याला मालधक्का चौकातुन पुणे स्टेशनकडे नेले होते. मात्र, काही वेळाने तो एकटाच परतला होता अशी माहिती महिलेने पोलिसांना दिली.

पोलिसांनी संशयित व्यक्ती सुरज आगवान याचा शोध घेण्यास सुरूवात केली. दरम्यान,
8 जुलै 2023 रोजी आरोपी सुरज आगवान हा शाहीर अमर शेख चौकाकडे येणार असल्याचे समजले.
त्यानंतर पोलिसांनी त्याला सापळा रचुन अटक केली.
त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने मयताने त्याच्या पतीकडे शरीर सुखाची मागणी
केल्याने त्याचा गळा दाबून आणि डोक्यात दगड घालून खून केल्याचे कबुल केले.

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil),
पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil), सहाय्यक पोलिस आयुक्त आर.एन. राजे (ACP R.N. Raje), वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील (Sr PI Santosh Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी संदीप मधाळे (Police Officer Sandeep Madhale), रविंद्र गावडे (Police Officer Ravindra Gawde), पोलिस अंमलदार ज्ञानेश्वर गायकवाड, विलास केकान, शरद ढाकणे, शिवाजी सरक, मनोज भोकरे, अनिल कुसाळकर, किरण तळेकर, मनिष संकपाळ आणि राजु धुलगुडे यांच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे.

Web Title : Pune Crime News | ‘Murder’ exposed by Bundagarden police without any evidence! Did ‘game’
by demanding body pleasure from her husband

Related Posts