IMPIMP

Pune Crime News | इराणी टोळीचा म्होरक्या नादर चंगेज इराणीसह 12 जणांविरूध्द ‘मोक्का’, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची 24 वी MCOCA कारवाई

by nagesh
Pune Crime News | Police Commissioner Ritesh Kumar's 24th MCOCA action against 12 persons including Nader Genghis Irani, the leader of Irani gang

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी इराणी टोळीचा (Irani Gang
Pune) म्होरक्या नादर चंगेज इराणी याच्यासह 12 जणांविरूध्द मोक्का कायद्याअंतर्गत MCOCA (Mokka Action) कारवाई केली आहे. पोलिस
आयुक्तांची ही 24 वी मोक्का कारवाई आहे. खडकी पोलिस स्टेशनमध्ये (Khadki Police Station) इराणी आणि त्याच्या साथीदारांविरूध्द खुनाच्या
प्रयत्नाचा (Attempt To Kill) गुन्हा दाखल आहे. सदरील गुन्हयातील 7 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून इतर 5 जणांचा शोध घेतला जात आहे.
(Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

जमीर कंबर इराणी (23), कासीम आबालु इराणी (23), मोहमद शौकत शेख (30), मेहंदीहसन कंबर इराणी (21), जैनब फिदा इराणी (21), शहजादी उर्फ मुथडी जावेद इराणी (43) आणि सोगरा उर्फ नरगिस समीर इराणी (24) यांना खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयात अटक केली आहे. त्यांच्या 5 साथीदारांचा शोध घेतला जात आहे. (Pune Crime News)

 

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 21 एप्रिल 2023 रोजी आरोपींनी एकाच्या खुनाचा प्रयत्न केला होता. टोळीचा म्होरक्या नादर चंगेज इराणी हा त्याच्या इतर साथीदारांना सोबत घेवुन स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत होता. खडक पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णु ताम्हाणे (Sr PI Vishnu Tamhane) यांनी पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate) यांच्या मार्फत अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांच्याकडे मोक्का कारवाईचा प्रस्ताव पाठविला होता. प्रस्तावाची छाननी करून आरोपींविरूघ्द मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

 

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत तब्बल 24 संघटीत टोळयांवर मोक्का अंतर्गत कारवाई कली आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे,
सहाय्यक पोलिस आयुक्त आरती बनसोडे (ACP Arti Bansode) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णु ताम्हाणे,
पोलिस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील (PI Mansingh Patil),
पोलिस उपनिरीक्षक वैभव मगदूम (PSI Vaibhav Magdum),
पोलिस अंमलदार राजकिरण पवार (Police Rajkiran Pawar),
रमेश जाधव (Police Ramesh Jadhav) यांनी हा मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी म्हणून प्रस्ताव पाठविला होता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | Police Commissioner Ritesh Kumar’s 24th MCOCA
action against 12 persons including Nader Genghis Irani, the leader of Irani gang

 

हे देखील वाचा :

Pune Cyber Crime News | पुण्यात बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने 1 कोटींची फसवणूक

Congress Mohan Joshi On Karnataka Assembly Election | कर्नाटकमधील कॉंग्रेसचा विजय
ही 2024 मधील केंद्रातील सत्तापालटाची नांदी – मोहन जोशी

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : हडपसर पोलिस स्टेशन – पत्नी आणि सासरच्यांकडील लोकांच्या
छळामुळे तरुणाने केली आत्महत्या; पत्नीने बनावट कागदपत्राद्वारे घर, जागा बळकाविली

 

Related Posts