IMPIMP

Pune Crime News | पुणे : पोलिस दलासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा ठेका देण्याच्या आमिषाने 30 लाखाची फसवणूक

by nagesh
Pune Crime News | Pune: 30 lakh fraud on the lure of awarding the contract to install CCTV cameras for the police force

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | महाराष्ट्र पोलिस (Maharashtra Police) दलातील कोकण परिक्षेत्र (Konkan Range Police), नांदेड परिक्षेत्र (Nanded Range Police)आणि छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रातील (Chhatrapati Sambhajinagar Range Police) पोलिस विभागासाठी सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) बसविण्याचे काम देण्याच्या आमिषाने 30 लाख रूपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या विमाननगर पोलिस स्टेशनच्या (Vimannagar Police Station) हद्दीत घडली आहे (Lure Of Work Of CCTV Camera). याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात दोन महिलांसह 7 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी विमाननगर परिसरातील झिरकॉन सोसायटीमध्ये (Zircon Society Viman Nagar) राहणार्‍या व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अजित शहा (45), मयुरा शहा (36), संदीप दरेकर (32), साइराज परवत, रवि सैनी (43) आणि संगीता शर्मा यांच्याविरूध्द भादंवि 406, 420, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी व्यावसायिकाची आरोपींसोबत ओळख झाली होती.
आरोपींनी आपआपसात संगणमत करून फिर्यादी व्यावसायिकास महाराष्ट्र पोलिस दलातील कोकण परिक्षेत्र,
नांदेड परिक्षेत्र आणि छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रातील पोलिस विभागाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम
त्यांच्या कंपनीला मिळवुन देण्याचे आमिष दाखविले. त्यांच्याकडून वेळावेळी असे एकुण 30 लाख रूपये घेतले.
मात्र, व्यावसायिकास सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम दिले नाही.
आपली फसवणूक (Fraud Case) झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पाठक (API Pathak) करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Pune: 30 lakh fraud on the lure of awarding the contract to install CCTV cameras for the police force

Related Posts