IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चंदननगर पार्क पोलिस स्टेशन – 22 वर्षाच्या तरुणीला नेले दिल्लीला पळवून; प्रियकराचे अगोदरच लग्न झाल्याचे उघड

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Chandannagar Park Police Station – 22-year-old girl kidnapped to Delhi; It is revealed that the lover is already married

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | प्रेमसंबंधात (Love Affair) लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून एका २२ वर्षाच्या तरुणीला दिल्लीला पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. तेथे गेल्यावर आपण प्रेम करीत असलेल्या तरुणाचे अगोदरच लग्न झाले असल्याचे तिला आढळून आले. (Pune Crime News)

याप्रकरणी सैफ (रा. येरवडा) असे त्याचे नाव असून चंदननगर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका २३ वर्षाच्या तरुणाने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २५५/२३) दिली आहे. हा प्रकार वडगाव शेरी (Vadgaon Sheri pune) येथे २९ मे रोजी घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या कार्यालयात एका २२ वर्षाची तरुणी काम करत
असून वडगाव शेरी येथील मुलीच्या हॉस्टेलवर राहते. सैफ असे नाव असलेल्या तरुणाबरोबर तिचे प्रेमसंबंध होते.
त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिला २९ मे रोजी पळवून नेले. या तरुणीने आपल्या मैत्रिणीला फोन करुन सांगितले की,
सैफ याचे लग्न यापूर्वीच झाले असून मी घरी येत आहे. त्यानंतर ती अद्याप घरी आली नाही.
५ जून रोजी या तरुणीने आपल्या मैत्रिणीला फोन करुन सांगितले की,

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

सैफ ने तिच्या डोळ्याला पट्टी बांधून
अनोळखी ठिकाणी आणले आहे. तेथे बरेच लोक आहेत. मी तुम्हाला गुपचुप लोकेशन पाठवत आहे.
त्यानंतर तिने लोकेशन पाठविल. ते दिल्लीतील नोयडा (Noida Delhi) येथील असल्याचे आढळून आले.
हा प्रकार समजल्यावर या तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक पालवे (PSI Palve) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Pune Crime News : Chandannagar Park Police Station – 22-year-old girl kidnapped to Delhi; It is revealed that the lover is already married

Related Posts